Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! राज्यभरातील सर्व शाळा 24 नोव्हेंबरला राहणार बंद; TET सक्तीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 12, 2025 | 07:48 AM
पवित्र पोर्टलवरून आता होणार शिक्षक भरती; 31 मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश

पवित्र पोर्टलवरून आता होणार शिक्षक भरती; 31 मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी शिक्षकांसाठी सक्तीची करण्यात आली आहे. या टीईटी सक्तीविरोधात राज्यभरातील शाळा 24 नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. या निर्णयाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसणार आहे.

राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने नुकतीच रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे राज्यभरातील शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांवर विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा.

हेदेखील वाचा : राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच तर 33572 शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उत्तीर्ण

दोन आठवड्याच्या आत याबाबत कार्यवाही झाली नाही. तर २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना यांनी मंगळवारी दिला.

दरम्यान, आंदोलनानंतरही पुनर्विचार याचिका दाखल झाली नाही, तर संघटना थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून शिक्षकांना लक्ष्य केले जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, चुकीचे संदर्भ लावून शिक्षकांवर कारवाया करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी केला.
राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शिक्षकांना लक्ष्य करण्याच्या घटना थांबविणे अपेक्षित असून अनेक अनुभवी शिक्षकांना टीईटी नसल्याने नोकरीवर धोका निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा, अन्यथा शिक्षक रस्त्यावर उतरून २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक समितीकडून देण्यात आला.

…अन्यथा शिक्षण क्षेत्रात पसरेल मोठा असंतोष

‘टीईटी’ सक्तीचा निर्णय लागू करताना अनुभवी शिक्षकांना संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या सेवा-सुविधांवर गदा येऊ नये, अन्यथा शिक्षण क्षेत्रात मोठा असंतोष उसळेल. याबाबत गांभीर्याने विचार करून त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन शिक्षक संघटनांनी केले असल्याचे प्राथमिक शिक्षक समितीचे सतिश कोळी यांनी सांगितले.

…तर संघटना थेट सर्वोच्च यायालयात याचिका दाखल करणार

आंदोलनानंतरही पुनर्विचार याचिका दाखल झाली नाही, तर संघटना थेट सर्वोच्च यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून शिक्षकांना लक्ष्य केले जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

Web Title: All schools across the state will remain closed on november 24 for tet protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 07:46 AM

Topics:  

  • Education Sector
  • maharashtra news
  • TET Exam
  • TET Protest

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
1

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश
2

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
3

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.