Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; साताऱ्यात युथ पॅंथरचे अनोखे निदर्शने

सर्वोच्च न्यायालयाच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात साताऱ्यात युथ पँथर संघटनेने 'झुरळ' वेश परिधान करून अनोखे आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रोजगार योजनांमधील अटी शिथिल करण्याची मागणी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 22, 2026 | 04:07 PM
Satara News: तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; साताऱ्यात युथ पॅंथरचे अनोखे निदर्शने
Follow Us
Follow Us:

 

  • तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
  • साताऱ्यात युथ पॅंथरचे अनोखे निदर्शने
सातारा, दि. २२ (प्रतिनिधी): तरुणांविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ युथ पॅंथर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी साताऱ्यात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. प्रतीकात्मक स्वरूपात झुरळाचा वेश परिधान करून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत न्यायव्यवस्था आणि शासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी केले. “देशातील तरुणांना कमी लेखणारी भाषा कोणत्याही जबाबदार पदावरील व्यक्तीकडून अपेक्षित नाही,” असे सांगत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनात पूजा बनसोडे, आदित्य गायकवाड, संदीप जाधव, अजय गाडगे, राज काकडे, जुबेर शेख यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते.

आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात तरुणांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये टाळण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच युवकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

Satara News: “मंत्री साहेब, किती दिवस खड्ड्यात?” खड्डे, धूळ अन् रखडलेले काम, म्हसवडमधील अर्धवट रस्त्यामुळे नागरिक हैराण

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांसाठी अर्ज करताना युवकांना कर्ज प्रक्रियेमधील विलंब, जाचक कागदपत्रे आणि प्रशासकीय अटींचा मोठा सामना करावा लागत आहे. योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावर केली जाते; मात्र प्रत्यक्षात अनेक पात्र युवक लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, झुरळाचा पोशाख परिधान करून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले असून शहरात दिवसभर या आंदोलनाची चर्चा सुरू होती.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ दिवशी होणार मतदान; प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

Web Title: Allegations of neglecting youth issues youth panther stages unique protest in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प
1

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प

Ashadhi Wari 2026: हरिनामाच्या गजरात सातारा दुमदुमला! संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
2

Ashadhi Wari 2026: हरिनामाच्या गजरात सातारा दुमदुमला! संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई; सात जण अटकेत, २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई; सात जण अटकेत, २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणाची १५ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी, प्रकरण अंतिम टप्प्यात
4

जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणाची १५ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी, प्रकरण अंतिम टप्प्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.