Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई; सात जण अटकेत, २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा जिल्ह्यात खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल आणि रोख रक्कम असा 21.19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक झाली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 14, 2026 | 10:16 PM
खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद,

खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद,

Follow Us
Follow Us:

सातारा, दि. १४ (प्रतिनिधी) : पोलीस असल्याची खोटी बतावणी करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर बॅरेकेडिंग लावत वाहनचालकांना अडवून कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, फलटणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी सांगितले की, १३ जुलै रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास वर्धनगड (ता. खटाव) येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही जणांनी बॅरेकेडिंग करून वाहनचालकांकडून पैसे उकळत असल्याची गोपनीय माहिती पुसेगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे खाकी व खाजगी पोशाखातील महिला-पुरुष वाहनांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक करत असल्याचे आढळून आले.

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प

पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून सात जणांना ताब्यात घेतले. चौकशीत ते पोलीस खात्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळी अडविण्यात आलेले मोटारसायकलस्वार ऋषीकेश बाबासो शिरतोडे (रा. नागनाथवाडी) व सूरज लहुकुमार शिरतोडे (रा. ललगुण) यांनी आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवत त्यांच्याकडून ५०० रुपये उकळल्याची तक्रार केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विकास दत्तात्रय शिंदे (रा. नागाव रस्ता, ता. वाळवा), वैभव पांडुरंग पवार, राहुल सुनील पाटील, केतन बाबासाहेब महाजन (सर्व रा. मिरज परिसर), प्रियांका रणदीप नाईक (रा. शिरोळ, जि. कोल्हापूर), प्रियांका संजय भोरे आणि अरुणा दयानंद आवळे यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून रात्रीच्या वेळी वाहनचालकांकडून खंडणी उकळल्याची कबुली दिली.

एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त

कारवाईदरम्यान टाटा सफारी स्टॉर्म (एमएच-१२ एमएफ-३८३२), मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच-१० सीए-४९३७), आठ अँड्रॉईड मोबाईल, २,२०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दऱ्याबा नरळे व चालक तुषार बाबर यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले.

Web Title: Satara fake police extortion gang arrested pusegaon police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:16 PM

Topics:  

  • Satara
  • Satara Crime
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
1

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
2

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन
3

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक
4

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.