मुंबई : राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने (State Relief and Rehabilitation Department) राज्यात लागू करण्यात आलेल्या कोविड-१९ (Covid -19)च्या निर्बंधात काही अटी शर्तींवर मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्याबाबत मार्गदर्शक आदेश जारी केले आहेत.
संपूर्ण लसीकरण (Fully Vaccinated) झालेल्यांच्या व्यवहारांना पूर्ण अनुमती देण्यात आली असून त्याबाबत स्थानिक प्रशासनाला जबाबदारी देण्यात आली आहे. या बाबत अ गटा तील नागरीकांना मुभा असली तरी ब गटामध्ये ती पन्नास टक्के मर्यादेत राहणार आहे. या आदेशात १४ जिल्ह्यांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे त्यात मुंबई शहर आणि उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर, रायगड, वर्धा, रत्नागिरी,सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्हांच्या समावेश करण्यात आला आहे.
[read_also content=”Russia Ukraine War : भारतीय विद्यार्थ्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी; केलंय हे आवाहन, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/india-advises-all-indians-in-ukraines-kharkiv-to-leave-immediately-for-their-safety-security-know-the-full-details-here-nrvb-248061.html”]
राज्यातील शहरी आणि ग्रामिण भागात त्या त्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील स्थितीनुसार हे निर्बंध चार मार्च पासून लागू करण्यात आल्याचे मदत आणि पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांनी आदेशात नमूद केले आहे. मुख्यमंत्री आणि कोविड टास्क फोर्स यांच्या मान्यतेने आज मुख्यमंत्री कार्यालयातून हे आदेश जाहीर करण्यात आले.
त्यात राज्यात दोन डोस घेतलेल्या नागरीकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाची अडसर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून पॉझिटिव्हिटी दराच्या स्थितीनुसार पन्नास टक्के आणि शंभर टक्के क्षमतेने सार्वजनिक सेवा, आणि व्यवहार सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत.
या बाबतच्या नव्या आदेशात म्हटले आहे की २५ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नव्याने काही निर्बंधात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे नियम चार मार्चला मध्यरात्रीनंतर अंमलात येणार आहेत. त्याबाबत राज्याचा आरोग्य विभाग तसेच भारत सरकराच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापलिका क्षेत्र आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात पहिल्या डोस घेतलेल्यांची संख्या लोकसंख्येच्या ९० टक्के असून राज्यात दोन्हि डोस घेणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. तसेच पॉझिटिव्हिटी दर दहा टक्के इतका आहे. तसेच रूग्णालयांतील रूग्णांची खाटा व्यापण्याची टक्केवारी ४० टक्के पेक्षा कमी आहे.
[read_also content=”आयुर्वेदाचा सल्ला, सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा, आतड्यातील विषारी पदार्थ बाहेर येतील, हे आहेत ‘५’ फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/according-ayurveda-5-health-benefits-of-eating-ghee-empty-stomach-reveal-nutritionist-avanti-deshpande-nrvb-248044.html”]
या निकषाना आधिन राहून स्थानिक प्रशासनाने आपापली स्थितीचा आढावा घेवून लसीकरणाचे दोन्हि डोस झालेल्या आणि वरील निकष पूर्ण करणाऱ्या भागात शंभर टक्के देनंदिन व्यवहारांना मुभा द्यावी, तर या निकषाचे पालन होत नसलेल्या भागात पन्नास टक्केची मर्यादा घालून दैनंदिन व्यवहारांना मुभा द्यावी.
यामध्ये संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात यावे असे सूचविण्यात आले आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्यांच्या व्यवहारांना पूर्ण अनुमती देण्यात आली असून त्याबाबत स्थानिक प्रशासनाला जबाबदारी देण्यात आली आहे. या बाबत अ गटा तील नागरीकांना मुभा असली तरी ब गटामध्ये ती पन्नास टक्के मर्यादेत राहणार आहे.
या आदेशात १४ जिल्ह्यांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे त्यात मुंबई शहर आणि उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर, रायगड, वर्धा, रत्नागिरी,सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्हांच्या समावेश करण्यात आला आहे.