
Jalgaon News: शिकार चार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अशोक भाऊराव पाटील हे सकाळी म्हशीचे दूध धुवायला गेले असता त्यांना त्यांच्या म्हशीचे पारडू हिंस्र प्राण्याने खाल्लेले दिसले. त्यांनी सरपंच सह गावातल्या नागरिकांना बोलावले. वनपाल गुलाब पिंजारी याना बोलावले असता त्यांनी शिकार करण्याच्या पद्धतीवरून बिबट्या असल्याची खात्री दिली.गेल्या १५ दिवसांपासून बिबट्या गायब झाला होता. मात्र त्यापूर्वी हिंगोणे, नंदगाव, अंतुरली रंजाणे, पिंपळे, ढेकू रस्ता, शिरूड, मंगरूळ, गांधली, गडखांब परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. Jalgaon News:
शेतकरी शेतात जायला तयार नव्हते, मजूर मिळत नव्हते आधीच दुष्काळात उत्पन्न कमी आणि त्यात बिबट्याच्या भीतीने माल काढता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. आठ दहा दिवसापासून बिबट्या दिसत नसल्याने शेतकरी निचीन्त झाले होते. वनपाल गुलाब पिंजारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे, सरपंच सचिन पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासमक्ष मृत पारडूचे शवविच्छेदन करण्यात आले.
यापूर्वी हिंगोणे येथे संतोष शंकर पाटील यांच्याही जनावराचा फडशा पाडण्यात आला होता. तर उमेश पारधी रा. अंतुर्ली यांच्या एक गाय आणि वासरू बिबट्याने खाल्ले होते. निम गावात बिबट्याचा वावर दिसून आला. तांदळी रस्त्याला गुलाब आनंदा पाटील यांच्या केळीच्या शेतीमधून निघून बाळू मुलचंद पाटील यांच्या शेताकडे जाताना प्रत्यक्ष ग्रामसेवक मंगळे यांना आढळून आला.
Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण
बिबट्या दिसला की वनविभागाला बोलावले जाते. वनविभाग बिबट्याचे पदमार्क मिळाले नाहीत तर बिबट्या नसल्याचे सांगतात. वन विभाग एकीकडून पिंजरा काढून दुसरीकडे लावतात तर चिबट्या दुसरीकडे दिसतो. लगेच वनविभाग तिकडचा पिंजरा काढून संबंधित ठिकाणी लावतात, पण विवट्चा मात्र सापडत नाही. त्यामुळे वनविभागावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
“शेतकऱ्यांनी आपली गुरे बंदिस्त करून ठेवावीत, रात्री एकट्याने बाहेर जाण्याऐवजी सोबत कोणालातरी घेऊन काठी आणि वेंटरी घेऊन जावे, पिंजऱ्यात बिबट्यासाठी शिकार म्हणून शेळी ठेवत आहोत पण बिबट्या हाती लागत नाही.”
“आमच्याच गावाची तीन गुरे बिबट्याने शकत नाहीत. वनविभागाने ठोस उपाययोजना करावी नुसता देखावा करू नये अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल”