Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गरीब की बीवी सबकी…’ महासभेत असं काय बोलले ठाकरेंचे नगरसेवक? भाजप नगरसेवक धावून गेले अंगावर, महापौरांनी दोघांनाही बाहेर काढलं!

Jalgaon News : जळगाव महापालिकेच्या महासभेत 'गरीब की बीवी सबकी भाभी होती है' या नगरसेवक इबा पटेल यांच्या वक्तव्यामुळे गोंधळ झाला. भाजप नगरसेवक विजय बांदल आक्रमक झाले, तर महापौर दीपमाला काळे यांनी दोघांनाही सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.

  • By विवेक
Updated On: Nov 22, 2026 | 03:29 PM
Jalgaon Municipal corporation

Jalgaon Municipal corporation

Follow Us
Follow Us:
  • जळगाव महापालिकेच्या महासभेत वादग्रस्त वक्तव्याने गोंधळ
  • नगरसेवक इबा पटेल यांच्या विधानावर भाजप आणि शिंदे गटाचा आक्षेप
  • नगरसेवकाच्या अंगावर धावून गेल्याने वातावरण तापले
 

जळगाव : महापालिकांच्या सभागृहात होणारे राजकीय घमासान काही नवे नाही. आजपर्यंत अनेक शहरांच्या महापालिकेत, नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडल्याच्या वार्ता ऐकिवात आहेत. अश्यातच आता जळगाव महापालिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक यांच्यात झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला आणि शेवटी महापौरांनाच कठोर भूमिका घ्यावी लागली. (Jalgaon News)

शहरातील विकासकामांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या जळगाव महापालिकेच्या महासभेत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा एका नगरसेवकाच्या वक्तव्याचीच चर्चा रंगली. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इबा पटेल यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला.

भाजप नगरसेवक विजय बांदल यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर दोन्ही नगरसेवकांना दहा मिनिटांसाठी सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले.

Satara News : ‘शिवेंद्रसिंहराजेंवर बोलाल तर खबरदार!’ जावळीत महायुतीला घरचा आहेर,जागावाटपाच्या राजकारणावर सौरभ शिंदेंचा थेट निशाणा

नेमकं काय घडलं?

जळगाव महापालिकेच्या महासभेत शहरातील विविध विकासकामांवर चर्चा सुरू होती. यावेळी नगरसेवक इबा पटेल यांनी आपल्या प्रभागातील कामांचा मुद्दा उपस्थित केला. आपण सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक नसल्याने आपल्या प्रभागातील कामांना अपेक्षित प्राधान्य मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

आपली बाजू मांडताना पटेल यांनी, ‘गरीब की बीवी सबकी भाभी होती है…’ असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे सभागृहात उपस्थित नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. विशेषतः महिलांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

या वक्तव्यावरून भाजप नगरसेवक विजय बांदल चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. ते इबा पटेल यांच्या अंगावर धावून गेल्याने सभागृहातील वातावरण आणखी तापले. काही काळ महासभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

महापौरांचा थेट आदेश, दोघांनाही सभागृहाबाहेर काढले!

घडलेल्या प्रकाराची महापौर दीपमाला काळे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी नगरसेवक इबा पटेल आणि विजय बांदल या दोघांनाही दहा मिनिटांसाठी सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. दोघेही बाहेर गेल्यानंतर महासभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.

दरम्यान, जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता असून विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावरून पटेल यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

एकीकडे शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असताना सभागृहात झालेल्या या प्रकारामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगाव महापालिकेच्या महासभेत गोंधळ का झाला?

    Ans: शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इबा पटेल यांनी 'गरीब की बीवी सबकी भाभी होती है...' असे वक्तव्य केले. या विधानावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ झाला.

  • Que: महापौर दीपमाला काळे यांनी कोणावर कारवाई केली?

    Ans: महापौर दीपमाला काळे यांनी इबा पटेल आणि भाजप नगरसेवक विजय बांदल या दोघांनाही दहा मिनिटांसाठी सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.

  • Que: इबा पटेल यांनी सत्ताधारी भाजपवर काय आरोप केला?

    Ans: आपण विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्याने आपल्या प्रभागातील विकासकामांना अपेक्षित प्राधान्य मिळत नसल्याचा आरोप इबा पटेल यांनी केला.

Web Title: Jalgaon news municipal corporation councillor controversial statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • BJP
  • Jalgaon News
  • Jalgaon Politics
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! भाजपला सोडचिठ्ठी देत ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये
1

इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! भाजपला सोडचिठ्ठी देत ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये

Yuzvendra Chahal : क्रिकेटच्या मैदानानंतर युझवेंद्र चहलची राजकीय इनिंग सुरू! BJP मध्ये प्रवेश करताच मिळाली मोठी जबाबदारी
2

Yuzvendra Chahal : क्रिकेटच्या मैदानानंतर युझवेंद्र चहलची राजकीय इनिंग सुरू! BJP मध्ये प्रवेश करताच मिळाली मोठी जबाबदारी

BJP OBC Morcha : भाजपच्या OBC मोर्चात मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील कोणाकोणाला मिळाली संधी? पाहा यादी
3

BJP OBC Morcha : भाजपच्या OBC मोर्चात मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील कोणाकोणाला मिळाली संधी? पाहा यादी

Kerala Politics: भाजपला दोन दिवसांत दुसरा धक्का; पद्मजानंतर पद्मिनी थॉमस यांचाही भाजपला रामराम
4

Kerala Politics: भाजपला दोन दिवसांत दुसरा धक्का; पद्मजानंतर पद्मिनी थॉमस यांचाही भाजपला रामराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.