Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambegaon Election News: आंबेगावात राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा; शिवसेनेला डावलल्यास बसू शकतो मोठा फटका

आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकून ठेवायचे असेल तर पक्षश्रेष्ठींनी लोकमतातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संधी देणे गरजेचे आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 26, 2025 | 04:18 PM
Ambegaon Election News, NCP Politics,

Ambegaon Election News, NCP Politics,

Follow Us
Close
Follow Us:
  • आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका
  • अजित पवार गटासाठी अग्निपरिक्षा
  • जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका
Ambegaon Election News:  राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पक्षाच्या दृष्टीने अग्निपरीक्षा ठरणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा प्रभाव कमी होत असल्याचे एकूण राजकीय परिस्थितीवरून दिसून येते. महायुती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिंदे गटाला विश्वासात घेत नसल्याने आणि शिवसेनेचे तालुक्यात राजकिय प्राबल्य असताना भविष्य काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने’ शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बरोबरीने घेऊन निवडणुका लढल्या नाही तर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा प्रभाव निश्चितच कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला; कुणाला मिळणार पहिली उमेदवारी?

आंबेगाव तालुक्याची राजकीय राजधानी असलेल्या मंचर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष पदाचा निकाल नुकताच लागला. झालेल्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री गांजाळे या विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोनिक सुनिल बाणखेलेना २१० मतांनी पराभुत केले. २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपा अशी महायुती राहिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मंचर शहरातून 2 हजार 200 हून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. मात्र त्याच मंचर शहरात आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला. त्याला कारणही तसेच आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बरोबरीने घेतले नाही. भाजपा बरोबर युती केली.

शिवसेनेला विश्वासात घेणे गरजेचे

तसे पाहिले तर मंचर शहरात आणि तालुक्यात भाजपचा पाहिजे तेवढा राजकिय प्रभाव नाही. भाजपची पाळेमुळे तालुक्यात आता कुठे वाढत चालली आहेत. त्या तुलनेत शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath shinde)  गटाचे राजकीय प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने शिवसेनेला विश्वासात घेणे गरजेचे आहे आणि तसे झाले नाही तर त्याची राजकीय किंमत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितच मोजावी लागणार आहे.

आंबेगाव तालुक्याच्या राज को य परिस्थितीबाबत विश्लेषण करायचे झाले तर सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बैंकफुटवर येत चालला आहे. कारण पक्षात निष्ठावंतांना पक्षाच्या राजकारणात संधी दिली जात नसल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत होत आहे. हुजरेगिरी करणाऱ्यांना झुकते माप आणि चटया उचलणाऱ्यांना मात्र बाजूला केले जात असल्याचे आता उघड उघड बोलले जात आहे. त्यामुळेच एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा आंबेगाव तालुक्यात सध्या पक्षाचा राजकीय बुरुज ढासळत चालला असल्याचे एकंदरीत राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे.

BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार

राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत धुसफुस

विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात अंतर्गत राजकीय धुसफुस चालू आहे. लोकमतातील कार्यकर्त्याला संधी न देता केवळ नेत्यांच्या जवळ कायम राहणाऱ्या कार्यकर्त्यालाच राजकारणात संधी आणि उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप नुकत्याच झालेल्या मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता सर्वसामान्य कार्यकर्ते उघड उघड बोलून दाखवत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातून राष्ट्र‌वादी काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे दोघेही दिग्गज नेते तालुक्याच्या राजकारणात एकत्र असले तरी त्यांना राजकिय शह देण्यात इतर पक्ष यशस्वी ठरल्याचे दिसून येते.

लोकमतातील कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज

आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकून ठेवायचे असेल तर पक्षश्रेष्ठींनी लोकमतातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संधी देणे गरजेचे आहे सर्वसामान्य कार्यकत्यांना विश्वासात घेऊन राजकीय रणनीती आखणे देखील तितकेच गरजेचे वाटते. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाला विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या तर तालुक्यात महायुतीला यश मिळणे दुर नाही. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राजकीय भवितव्य अंधारात राहू शकते असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.

 

Web Title: Ambegaon election news a tough test for the ncp in ambegaon sidelining the shiv sena could lead to a major setback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • NCP Politics
  • Zilla Parishad Election

संबंधित बातम्या

Pune Politics : हडपसरची राजकीय गणिते आणि ‘संधी’चा शोध; पुण्याच्या राजकारणाचा घ्यावा बोध
1

Pune Politics : हडपसरची राजकीय गणिते आणि ‘संधी’चा शोध; पुण्याच्या राजकारणाचा घ्यावा बोध

राज्यात पुन्हात वाजणार घड्याळाची टीकटीक; अजित पवारांची मागणी शरद पवारांना होणार मान्य?
2

राज्यात पुन्हात वाजणार घड्याळाची टीकटीक; अजित पवारांची मागणी शरद पवारांना होणार मान्य?

सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
3

सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune Breaking News: ठरलं तर…! पुणे महापालिकेसाठी शरद पवार-अजित पवार एकत्र येणार, तारीखही निश्चित
4

Pune Breaking News: ठरलं तर…! पुणे महापालिकेसाठी शरद पवार-अजित पवार एकत्र येणार, तारीखही निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.