BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला...?
अशातच मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दादरमधील मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९२ साठी उमेदवाराची चर्चा झाली. या चर्चेच्या शेवटी या प्रभागात मनसेचे नेते यशवंत किल्लेदार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि ठाकरे सेनेच्या पहिल्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत प्रीती पाटणकर यांनी १९२ प्रभागातून ठाकरे गटातून विजय मिळवला होता.
Public Safety Law Maharashtra: महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा लागू, अध्यादेशही जारी
त्याचवेळी प्रभाग क्रं. १९२ साठी ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. जागावाटपात प्रभाग क्रं. १९२ मनसे आणि १९४ ठाकरेंच्या शिवेसनेला सोडण्यात आल्याची माहिती आहे. पण प्रभाग १९२ आपल्यला मिळावा, यासाठी ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे. त्यासाठी ते आज सायंकाळी चार वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हेदेखील शिवसैनिकांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
दरम्यान, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळणाऱ्या मुबंई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २२७ प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकराज आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर या महापौर म्हणून कार्यरत होत्या.
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ : संभाव्य कार्यक्रम जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०२६ च्या निवडणुकीसाठी संभाव्य कार्यक्रम समोर आला आहे. या कार्यक्रमानुसार डिसेंबर २०२५ अखेरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, जानेवारी २०२६ मध्ये मतदान आणि निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
नामांकन दाखल : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
नामांकन पत्रांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५
नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख : २ जानेवारी २०२६ पर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी / निकाल : १६ जानेवारी २०२६






