लखनौमध्ये भाजपच्या ब्राह्मण आमदार बैठक आणि पार्टी झाली (फोटो- सोशल मीडिया)
उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान, भाजपच्या या 40 ब्राम्हण आमदारांची बैठक झाली आहे. यापूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील अशाच प्रकारे जातीय आधारित राजकीय बैठक घेण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी क्षत्रिय समाजाची बैठक झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकारण आणि राजकारणामध्ये असलेले जातीय समीकरण हे चर्चेचा विषय ठरले आहे.
हे देखील वाचा : Railway Ticket Price Increase : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशमधील विधानसभा आणि विधान परिषदेच्या ब्राम्हण आमदारांची ही डीनर पार्टी झाली. यामध्ये 40 हून अधिक ब्राम्हण आमदार सहभागी झाले होते. एका भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी हे रात्रीचे स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. मात्र या भोजनाचा लाभ फक्त ब्राम्हण आमदारांनीच घेतला. यावरुन जोरदार टीका झाल्यानंतर भाजपने याचे उत्तर ही एक वैयक्तिक पार्टी असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या डीनर पार्टीमध्ये अनेक ब्राम्हण नेते सहभागी झाले होते. यामध्ये फक्त जेवण नाही तर त्यानंतर चार तास राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये उत्तर प्रदेशमधील राजकारणामध्ये ब्राम्हणांना डावलले जात असल्याची नाराजी या नेत्यांमध्ये होती. यावर दीर्घ चर्चा झाल्यानंतर चार तास हे नेते विविध राजकीय विषयांवर भाष्य आणि चर्चा करत होते. संध्याकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत आमदारांची ही खास बैठक झाली.
हे देखील वाचा : PM मोदींचा कार्यक्रम संपला अन् झाली चोरी: कुंड्यांसाठी उडाली झुंबड
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सावरासावर केली आहे. ते म्हणाले की, हे सर्व आमदार अधिवेशनाच्या निमित्ताने लखनऊमध्ये जमा झाले आहेत. यामुळे त्यांच्या या बैठकीकडे जातीय भिंगातून बघणे बंद करा. हे चुकीचे आहे. जेव्हा आमदार एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकत्र जेवण करत असतात. त्यामुळे याकडे फक्त ब्राम्हण आमदारांची बैठक म्हणून बघायला नको, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी दिली आहे.






