
Amit Shah UCC Statement Mumbai,
भेटीनंतर शाह आणि शिंदे एकाच गाडीतून एशियाटिक सोसायटीच्या कार्यालयात पोहोचले. अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते भाजप नेते आणि त्यांचे निकटचे सहकारी आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सव कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत.
पक्षातील काही विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, शाह सहसा शेलार यांच्या गणेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शाह आणि शिंदे यांच्या भेटीकडे विशेष महत्त्वाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार
“देशात आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे शासन असलेल्या २१ राज्यांमध्ये समान नागरी संहिता लागू केली जाईल.भाजपने यापूर्वीही अनेक राज्यांमध्ये आधीच समान नागरी संहिता विधेयक लागू केले आहे.”अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. देशभरात समान नागरी संहितेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच अमित शाहांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
अमित शाह यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आम्ही अनेक राज्यांमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू केली आहे.मला विश्वास आहे की, २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारांच्या काळात आम्ही सर्व २१ राज्यांमध्ये समान आचारसंहिता (UCC) लागू करू. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या कारवायांनी विविध क्षेत्रांतील सुरक्षेला प्राधान्य देताना दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुतेचे धोरण प्रस्थापित केले आहे.
यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ले, सर्जिकल स्ट्राईक, हवाई हल्ले आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमांबद्दल भाष्य केलं. “दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे धोरण स्वीकारून भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. कलम ३७० रद्द करण्याचा, नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्याचा आणि ईशान्य भागातील समस्या सोडवण्याचा सरकारच्या निर्णयामुळे देशाला तीन मोठ्या संकटांपासून दिलासा मिळाला आहे.
स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप
मुंबईत ५२ व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स सोहळ्यात बोलताना गृहमंत्री शाह म्हणाले, “एखाद्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच्या हद्दीत घुसखोरी करून प्रत्युत्तर दिले जाईल आणि देशाला असा कठोर निर्णय घेण्यास सक्षम असलेले पंतप्रधान मिळतील, याची कोणी कल्पना तरी केली होती का, सर्जिकल स्ट्राईक असो, एअर स्ट्राईक असो किंवा ऑपरेशन सिंदूर असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे संरक्षण धोरण अवलंबले आहे की, भारतावर हल्ला करण्याचा विचार करण्यापूर्वीही शत्रू दोनदा विचार करेल आणि थरथर कापेल.
गृहमंत्री म्हणाले की, रामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम असो, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असो, केदारनाथचे पुनरुज्जीवन असो किंवा महाकाल लोक असो, भारताने असे काही साध्य केले आहे ज्याबद्दल लोक अनेक दशकांपासून बोलण्याचे धाडस देखील करत नव्हते.