Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार
Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाच्या सोळाव्या दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप करतानाच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले. ‘मुंबईत जाऊन मरेन, पण सरकारसमोर गुडघे टेकणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रयाण करून १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा त्यांनी पुन्हा केली.
चौकशांच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, आंदोलन सुरू असतानाच त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची चौकशी का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महसूल विभागातील अधिकाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही अधिकारी काम करत असल्याचा दावा करत, हे सर्व दबावाखाली होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार
हैदराबाद गॅझेट, सातारा व कोल्हापूर गॅझेट, कुणबी सेट, कण्या प्रमाणपत्रांचा प्रश्न, तसेच एमपीएससी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात.’ सरकारला आणखी आठ दिवसांची संधी आहे.
– मनोज जरांगे, मराठा नेते
सरकारकडून आपल्याला आंदोलनापासून दूर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. चौकशांना शरण जाऊन मी घाबरणार नाही. आंदोलनाच्या ठिकाणी मरेन; पण सरकारसमोर गुडघे टेकणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. जरांगे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही गंभीर आरोप केले. मुंबईतील आंदोलनादरम्यान आपल्याला गोळ्या घालण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. या वक्तव्यावेळी ते भावुक झाले. ‘मला काही झाले तरी मराठ्यांनी एकत्र राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी
आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी नाकारण्यात आल्याच्या मुद्द्यावरही जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘द्वेषभावनेतून परवानगी नाकारण्यात आली आहे. आम्ही संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत,’ असे ते म्हणाले. सरकारने पाणी व औषधोपचार बंद करण्यास भाग पाडल्यास आपण उपचारही स्वीकारणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.






