Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का! भाचे अमोल महाडिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2026 | 04:54 PM
खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का! भाचे अमोल महाडिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का! भाचे अमोल महाडिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

देशात लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवत भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून ते देशासाठी अंत्यत घातक आहे, म्हणून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा लढा पुकारला आहे. हुकूमशाही प्रवृत्तींच्या हातून देश वाचवणे हे सर्वात महत्वाचे आहे. राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या लढाईला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. तरुण वर्गांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. राहुल गांधी यांच्या लढ्यात सहभागी होत त्यांचे हात बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहेत. कॅप्टन अमोल महाडिक यांनीही तोच मार्ग निवडला असून देशाला खऱ्य़ा अर्थाने काँग्रेसचा विचार व राहुल गांधी यांचे नेतृत्वच तारू शकते हा विश्वास दृढ होत आहे. अमोल महाडिक यांना प्रोफेशनल काँग्रेस विभागात काम करण्याची संधी देण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षालाही फायदाच होईल”, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“आमचे कुटुंब काँग्रेस विचाराचेच असून आजोबा दत्ताजीराव उर्फ आण्णासाहेब तटकरे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने घरी आल्यासारखे वाटत आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्वच देशाला तारु शकणार आहे म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, पक्ष जी जबाबदारी देईल ती समर्थपणे पार पाडेन”, असे अमोल महाडिक यावेळी म्हणाले.

सरकारचाच परवाना रद्द करा

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अन्न व औषध विभागाने राज्यात स्वच्छता मोहिम हाती घेत कडक कारवाई सुरु केली आहे. जेथे जेथे अस्वच्छता, घाण पसरली आहे ती साफ झालीच पाहिजे. ज्या हॉटेल वा कॅन्टिनमध्ये अस्वच्छता दिसते व घाणीचे साम्राज्य दिसते त्याचा परवाना रद्द केला जात आहे, तसेच या सरकारवरही कारवाई झाली पाहिजे. हे सरकारच घाणीतून आले असून सगळीकडे घाण पसरवत आहे म्हणून या सरकारचाच परवाना रद्द केला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : ‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाहच जबाबदार’, मल्लिकार्जुन खरगेंचा थेट हल्लाबोल, गृहमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ तात्काळ मागणी

जरांगे यांना आतापर्यंत कोणती आश्वासने दिली.

मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुती सरकाने मनोज जरांगे यांना दोनवेळा आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले तरीही त्यांना पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. सरकारने जरांगे यांना याआधी कोणती आश्वासने दिली होती ती जाहीर करावीत. मुळात हे सरकारच खोटारडे आहे, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या फाईलवर सही करणार पासून सुरु झालेला हा प्रवास फसवा आहे. आरक्षणाच्या नावावर जाती-जातीत भांडणे लावणे हाच धंदा भाजपा महायुती सरकारचा आहे. सरकारला जर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी, ही काँग्रेस पक्षाची मागणी मान्य करावी, असेही सपकाळ म्हणाले.

Web Title: Amol mahadik joined the congress party in mumbai today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाहच जबाबदार’, मल्लिकार्जुन खरगेंचा थेट हल्लाबोल, गृहमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ तात्काळ मागणी
1

‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाहच जबाबदार’, मल्लिकार्जुन खरगेंचा थेट हल्लाबोल, गृहमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ तात्काळ मागणी

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘या’ घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान Manmohan Singh यांना क्लीन चिट; काय होते प्रकरण?
2

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘या’ घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान Manmohan Singh यांना क्लीन चिट; काय होते प्रकरण?

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण… पाहा Video
3

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण… पाहा Video

‘विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज विसरणार नाही; गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे’; लोकसभेत Gaurav Gogoi यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
4

‘विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज विसरणार नाही; गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे’; लोकसभेत Gaurav Gogoi यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.