Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: मनपाच्या मालमत्ता करात वाढीची तयारी! विरोधानंतर प्रस्ताव स्थगित; एप्रिल २०२७ पासून नवीन दराचे नियोजन

Amravati News: शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्य रस्त्यांवरील घरांचा समावेश ए किंवा बी श्रेणीत केला जाईल. तर मुख्य रस्त्यांपासून दूर असलेल्या अंतर्गत भागातील घरांवर तुलनेने कमी दराने कर आकारला जाईल. यामुळे मालमत्ता कर निश्चितीमध्ये एकसमानता आणण्यासह कमी-अधिक कर आकारणीबाबतच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 21, 2026 | 11:46 AM
मनपाच्या मालमत्ता करात वाढीची तयारी! विरोधानंतर प्रस्ताव स्थगित; एप्रिल २०२७ पासून नवीन दराचे नियोजन

मनपाच्या मालमत्ता करात वाढीची तयारी! विरोधानंतर प्रस्ताव स्थगित; एप्रिल २०२७ पासून नवीन दराचे नियोजन

Follow Us
Follow Us:

Amravati News: अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या दरात तब्बल २१ वर्षांनंतर मोठी वाढ करण्याची तयारी सुरू झाली आहे. २००५ मध्ये मालमत्ता कराचा दर प्रतिवर्षी प्रतिचौरस मीटर ९० रुपये निश्चित करण्यात आला होता. आता शासन स्तरावरून हा दर वाढवून २२५ रुपये प्रतिचौरस मीटर करण्याचा प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाला आहे. या प्रस्तावामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव तूर्तास स्थगित ठेवण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – istock)

Amravati News: जादा भाडे आकारणाऱ्या ३५ ट्रॅव्हल्सला दंड! अमरावती-पुणे प्रवासासाठी ४ हजार भाडे; आरटीओ अधिकाऱ्यांना धरले धारेवर

विरोधानंतर प्रस्ताव स्थगित

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी सांगितले की, नियमानुसार दर ५ वर्षांनी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून कराच्या दरात सुधारणा करणे आवश्यक आहे. असे असतानाही २००५ नंतर मालमत्ता कराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. प्रत्येक वेळी सर्वसाधारण सभेत करवाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. २०२२-२३ मध्येही करवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, प्रशासक राजवटीत शासन स्तरावरून त्याला स्थगिती देण्यात आली होती. आता २१ वर्षांनंतर शासनाने ही स्थगिती हटवून नवीन दर लागू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. सर्वसाधारण सभेत महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या गरजेचे सर्व नगरसेवकांनी समर्थन केले.

मात्र, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात करवाढ करण्यास त्यांनी आक्षेप घेतला. अनेक सदस्यांनी २० ते २५ टक्क्यांपर्यंतच कर वाढविण्याची सूचना केली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सभागृहनेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह सर्व सदस्यांनी तूर्तास प्रस्ताव स्थगित ठेवण्यावर सहमती दर्शविली. तसेच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते आणि अन्य सदस्यांचा समावेश असेल. ही समिती जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आपला अहवाल आणि करवाढीचा प्रस्ताव सादर करेल. फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय घेऊन एप्रिल २०२७ पासून नवीन दर लागू करण्याचे नियोजन आहे.

मालमत्तांचे वर्गीकरण करून ठरणार कर:

नवीन करप्रणालीमध्ये मालमत्तांचे ए, बी, सी, डी आणि ई अशा ५ श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्य रस्त्यांवरील घरांचा समावेश ए किंवा बी श्रेणीत केला जाईल. तर मुख्य रस्त्यांपासून दूर असलेल्या अंतर्गत भागातील घरांवर तुलनेने कमी दराने कर आकारला जाईल. यामुळे मालमत्ता कर निश्चितीमध्ये एकसमानता आणण्यासह कमी-अधिक कर आकारणीबाबतच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दीड लाख नवीन आणि विस्तारित मालमत्ता उघड

नोंदींमध्ये केवळ एक किंवा दोन खोल्यांची नोंद अधिक खोल्यांच्या इमारती किंवा व्यावसायिक नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी तसेच अस्तित्वातील मालमत्तांचे प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्र निश्चित करण्यासाठी महापालिकेने एका कंपनीला सर्वेक्षणाचे कंत्राट दिले होते. या सर्वेक्षणात ५५ हजार नवीन मालमत्ता आढळून आल्या आहेत. याशिवाय ९४ हजार अशा मालमत्तांचा शोध लागला आहे, ज्यांच्या जुन्या होती. मात्र, प्रत्यक्षात तेथे आता आठपेक्षा दुकाने उभारण्यात आली आहेत.

NCMC स्मार्ट कार्ड अन् ई-बसमुळे एसटीच्या उत्पन्नाला ब्रेक; अमरावती विभागाला १.८८ कोटींचा फटका

मालमत्तांची संख्या ३ लाख ५ हजारांपर्यंत पोहोचली

या सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत मालमत्तांची संख्या १ लाख ६० हजारांवरून ३ लाख ५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या कक्षेत मोठ्या संख्येने नवीन आणि विस्तारित मालमत्ता येणार असून, महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Amravati news municipal property tax increase put on hold new rates planned from april 2027 sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Amaravati
  • income tax
  • Property Tax

संबंधित बातम्या

Sambhajinagar Property Tax : मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मोठी संधी! शास्तीवर १०० टक्के माफी
1

Sambhajinagar Property Tax : मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मोठी संधी! शास्तीवर १०० टक्के माफी

Amravati News: ९३ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत! शासनाच्या विलंबावर नाराजी; नियमित कर्जफेड करूनही पदरी निराशाच
2

Amravati News: ९३ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत! शासनाच्या विलंबावर नाराजी; नियमित कर्जफेड करूनही पदरी निराशाच

Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई
3

Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई

Amravati News: जादा भाडे आकारणाऱ्या ३५ ट्रॅव्हल्सला दंड! अमरावती-पुणे प्रवासासाठी ४ हजार भाडे; आरटीओ अधिकाऱ्यांना धरले धारेवर
4

Amravati News: जादा भाडे आकारणाऱ्या ३५ ट्रॅव्हल्सला दंड! अमरावती-पुणे प्रवासासाठी ४ हजार भाडे; आरटीओ अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.