
100% Penalty Waiver Scheme Gets Good Response ( १००% दंड माफी योजनेला चांगला प्रतिसाद ) फोटो सौजन्य AI
त्याचवेळी अवैध प्लॉटिंग, अनधिकृत बांधकामे आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगविरोधातही कारवाई तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका मुख्यालयात सहाय्यक आयुक्त, इमारत निरीक्षक, नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आयुक्तांनी एकाच वेळी कर वसुली, अनधिकृत बांधकामे आणि शहरातील जाहिरात फलकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, नगररचनाकार कौस्तुभ भावे, उपायुक्त सविता सोनवणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्लॉटिंग किंवा नवीन इमारतींसाठी महापालिकेची परवानगी घेतली आहे की नाही, याची तपासणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नगररचना विभागाच्या बीपीएमएस (BPMS) प्रणालीचा वापर करण्याचे नियोजन आहे. यासाठी पुढील आठवड्यात सहाय्यक आयुक्त आणि इमारत निरीक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानग्यांची पडताळणी करताना प्रणालीचा वापर करण्यावर भर राहणार आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि फलकांविरोधातील कारवाईही अधिक तीव करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले, प्रत्येक प्रभागात नियमित कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी बैठकीत दिली. मात्र, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे आणि प्रथमदर्शनी धोकादायक वाटणारे होर्डिंग प्राधान्याने हटविण्याची सुचना आयुक्तांनी केली.
मालमता करावरील विलंब शारतीमध्ये १०० टक्के माफी देण्याच्या महापालिकेच्या योजनेला पहिल्या दहा दिवसांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कालावधीत १ हजार ६५० मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेत सुमारे तीन कोटी रुपयांचा कर भरला आहे. आता शहरातील चकबाकीदारांपर्यंत योजनेची माहिती पोहोच्यून करवसुलीला वेग देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. आगामी काळात १ लाख ६५ हजार बकबाकीदारांकडून ४०० कोटी रुपवांची वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महापौर आणि आयुकाांनी ६ नोवोबरपासून १०० टक्के विलंब शास्ती माफी योजना जाहीर केली आहे.
मागील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२५ वा कालावधीत ९५ टक्के शास्ती माफीची योजना लागू होती. त्यावेळी सुमारे ६० हजार थकबाकीदारांनी ११८ कोटी रुपयाचा कर भरला होता, यंदा मात्र खंजना जाहीर झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत तीन कोटीचा कर जमा झाला आहे.