Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : महापौरपदाचे आरक्षण ठरणार ‘गेमचेंजर’, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा धगधगणार; पक्षांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका

 २०१७ मध्ये भाजपला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर अमरावतीतील सत्ता स्थिर होती. दरम्यान गेल्या आठ-नऊ वर्षात शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी घडामोड झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2025 | 11:23 AM
महापौरपदाचे आरक्षण ठरणार 'गेमचेंजर', नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा धगधगणार; पक्षांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका (फोटो सौजन्य-X)

महापौरपदाचे आरक्षण ठरणार 'गेमचेंजर', नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा धगधगणार; पक्षांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

  • राजकीय वातावरणात मोठी धुरळण उडाली
  • अमरावतीतील पुढील पाच वर्षांचा सत्तासंग्राम ठरणार
  • राजकीय समीकरणांमध्ये मोठी घडामोड
अमरावती : महानगरपालिका निवडणुका (Maharashtra Local Body Election 2025) जवळ येत असताना शहरातील राजकीय वातावरणात मोठी धुरळण उडाली आहे. प्रभाग आरक्षण सोडतीनंतर आता राजकीय पक्षांचे आणि दावेदारांचे सारे लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे खिळले आहे. यंदाचे आरक्षणच अमरावतीतील पुढील पाच वर्षांचा सत्तासंग्राम ठरवेल, असा राजकीय अंदाज वर्तविला जात आहे. २०१७ मध्ये भाजपला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर अमरावतीतील सत्ता स्थिर होती. दरम्यान गेल्या आठ-नऊ वर्षात शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी घडामोड झाली आहे. जुन्या सत्तेची पकड सैल होत असून नवे चेहरे, नवी आघाड्‌या आणि नव्या महत्त्वाकांक्षा डोकावू लागल्या आहेत. म्हणूनच, महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग येणार आणि नव्या जुळणींची चढाओढ सुरू होणार, हे निश्चित मानले जाते.

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर

महापौरपद अमरावती राजकारणाचा केंद्रबिंदू २०२२ ते २०२५ या कालावधीत लोकप्रतिनिधींची सभा अस्तित्वात नसल्याने महापौरपद रिक्त राहिले. भाजपचे चेतन गावंडे हे या पदावरील शेवटचे निवडून आलेले प्रतिनिधी, अमरावतीतील महापौरपद हे केवळ सत्तेचे प्रतीक नसून पक्षीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे. गेल्या दोन दशकांपासून डॉ. सुनील देशमुख, जगदीश गुप्ता आणि आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये सुरू असलेली राजकीय रस्सीखेच आजही तीव्र आहे. यामुळे महापौरपद कोणाला मिळते यावरून शहरातील राजकीय वर्चस्व ठरते, अशी धारणा कायम आहे.

आरक्षण ठरवेल सर्वांची दिशाः नऊ वपनिंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, याची उत्सुकता उच्चांक गाठली आहे. जर पद सर्वसाधारण खुले राहिले, तर दावेदारीचा ‘मेगा‘ संघर्ष होणार. जर पद महिला प्रवर्गात गेले, तर अनेक पक्षांना नेतृत्व बदलावे लागेल, जर अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण आल्यास राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. राजकीय जाणकारांच्या मते, आरक्षण जाहीर होईपर्यंत सर्व पक्षांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. मात्र आरक्षण घोषित होताच नवी आघाड्या, नवीन गटबाजी आणि सत्तेच्या आकांक्षा कळसाला जाणार, हे निश्चित. अमरावतीच्या महापौरपदाचे आरक्षण हे येणाऱ्या निवडणुकीचे ‘ट्रिगर पॉइंट’ ठरणार असून शहरातील राजकारण कोणत्या दिशेने वळेल हे याच एका घोषणेतून स्पष्ट होणार, असा ठाम राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपक्ष ते पक्षीय सत्ता समीकरणांचा प्रवास

१९९२ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यापासून महानगरपालिकेने अमरावती अपक्ष राजकारणापासून पक्षीय सत्तेपर्यंतचा मोठा प्रवास अनुभवला आहे. एकेकाळी अपक्ष नगरसेवकांचे वर्चस्व आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेला राजकीय ‘खेळ’ हा नगरपालिका राजकारणाचा केंद्रबिंदू होता. २००२ नंतर पक्षीय राजकारण बळकट झाले आणि महापौरपदाभोवती पक्षीय स्पर्धा तीव्र झाली. १९९७ मध्ये भाजप शिवसेना युतीची सत्ता आणि २३ जागांवर भाजपचा कब्जा, त्यानंतर काँग्रेसचा अनपेक्षित उलटफेर आणि अपक्ष विलास इंगोले यांना मिळालेले तीन वर्षांचे महापौरपद ही सर्व घडामोडी आजही राजकारणातील ‘टर्निंग पॉइंट‘ म्हणून ओळखल्या जातात. पुढील दोन दशकांत काँग्रेसचे डॉ. दीपाली गवळी, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे तर भाजपचे संजय नरवणे आणि चेतन गावंडे यांनी महापौरपदी काम पाहिले. आजवर पाच महिला महापौर झाल्या आहेत, ही बाबही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.

अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका कधी?

    Ans: 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर (EVM) घेण्यात येणार आहे.

  • Que: किती मतदार आणि मतदान केंद्र असणार?

    Ans: एकूण मतदान केंद्र - १३,३५५

  • Que: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार?

    Ans: "३१ जानेवारीच्या पूर्वी आम्हाला सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. कोणत्याही परिस्थिती निवडणुका घ्या, असे आदेश आहेत."

Web Title: Amravati the reservation for the mayoral post will be a game changer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • amravati
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं’; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
1

‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं’; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ
2

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

‘ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,’ शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार
3

‘ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,’ शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…
4

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.