Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ

अमरावतीत हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू होताच बनावट आणि निकृष्ट हेल्मेटच्या विक्रीत वाढ झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ग्राहक संरक्षण संस्थेने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी करत, अशा हेल्मेटमुळे अपघाताच्या वेळी नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 03:20 PM
Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ

Follow Us
Follow Us:
  • अमरावतीत आयएसआय मानांकन नसलेल्या आणि निकृष्ट हेल्मेटची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
  • हेल्मेट सक्तीचा फायदा घेत काही विक्रेते बनावट हेल्मेट विकत असून नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होत असल्याची तक्रार आहे.
  • बनावट हेल्मेटविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अमरावती: शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू होताच निकृष्ट आणि अप्रमाणित हेल्मेटच्या विक्रीला ऊत आल्याचा गंभीर आरोप उत्प्रेरित कन्झ्युमर फाउंडेशन (दिल्ली) यांनी केला आहे. रस्त्यालगत फेरीवाले आणि काही विक्रेते आयएसआय मानांकन नसलेली, तसेच कालबाह्य अथवा रद्द झालेल्या परवान्याच्या उत्पादकांची हेल्मेट विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा दावा संस्थेने केला असून, याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.

Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

गेल्या आठ वर्षांपासून ग्राहक संरक्षण आणि रस्ता सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेने जागतिक आरोग्य संघटना तसेच देशातील रस्ते अपघातांच्या आकडेवारीचा दाखला देत दर्जेदार हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हेल्मेट सक्तीचा निर्णय हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक शिस्तीसाठी अत्यंत आवश्यक व स्वागतार्ह असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी निकृष्ट हेल्मेटचा वाढता बाजार हा या निर्णयालाच हरताळ फासणारा ठरत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. निवेदनात दिल्लीतील काही हेल्मेट उत्पादकांचे परवाने संपुष्टात आलेले किंवा रद्द झालेले असतानाही त्यांच्या नावाने हेल्मेटची विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमरावतीतही अशा हेल्मेटची विक्री होत असल्याचे पुरावे, छायाचित्रे आणि संबंधित ठिकाणांची माहिती संस्थेकडे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विशेष तपासणी मोहीम राबवावी

संस्थेचे स्वयंसेवक अनुराग चौहान यांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, रस्त्यालगत आयएसआय मानांकन नसलेली किंवा बनावट हेल्मेट विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवून अशा हेल्मेटचा साठा जप्त करण्यात यावा. तसेच बाजारात केवळ प्रमाणित आणि दर्जेदार हेल्मेटच उपलब्ध राहतील, याची प्रशासनाने खात्री करावी.

भायखळा पोलीस ठाण्यात आगीचा तांडव! अग्निशमन दलाकडून वेळेत आग आटोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?

१०० ऐवजी एक हजार रुपये किमत

हेल्मेट सक्तीमुळे मागणीत मोठी वाढ झाल्याचा फायदा घेत काही उत्पादक आणि विक्रेते निकृष्ट दर्जाची हेल्मेट बाजारात आणत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. अवघ्या १०० ते २०० रुपयात खर्चात तयार होणारी ही हेल्मेट तब्बल एक हजारपर्यंत विकली जात असून, अपघाताच्या वेळी ती चालकाचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरू शकतात. त्यामुळे स्वस्त आणि बनावट हेल्मेटमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याची गंभीर बाब संस्थेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यामुळे हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच बनावट आणि निकृष्ट हेल्मेटविरोधात विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याची मागणी पुढे आली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Fake isi helmet sale in amravati raises safety concerns action sought against substandard helmets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Amaravati
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
1

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
2

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
3

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
4

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.