भायखळा पोलीस ठाण्यात आगीचा तांडव! (Photo Credit- X)
मुंबई अग्निशमन दलाला रविवारी रात्री ८:२४ च्या सुमारास भायखळा पोलीस ठाण्यात आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह बेस्ट प्रशासन, स्थानिक पोलीस आणि महानगरपालिकेच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग इमारतीच्या इतर भागात पसरण्यापासून रोखली.
Mumbai दक्षिण मुंबई के भायखला पुलिस स्टेशन की इमारत में आग लगने की घटना सामने आई है। सूचना मिलते ही दमकल विभाग की टीम मौके पर पहुंची और आग पर पूरी तरह काबू पा लिया। प्रारंभिक जांच में आग लगने का कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है। फिलहाल पुलिस और संबंधित एजेंसियां मामले की… pic.twitter.com/YG2pLx9foe — Jayprrakash Singh (@jayprakashindia) July 26, 2026
मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू
या संपूर्ण घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (DCP जयंत मीना) यांनी सांगितले की, “भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीत अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाने अत्यंत वेळेत कारवाई करत ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.”
प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित पोलीस अधिकारी आणि तांत्रिक पथक या घटनेबाबत अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर






