Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heatwave News: ‘या’ जिल्ह्यामध्ये ‘हीट वेव्ह’चा इशारा, उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट

Amravati News : अमरावती जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. उष्माघाताच्या संभाव्य धोक्याचा विचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) विशेष तीन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 18, 2026 | 07:14 PM
'या' जिल्ह्यामध्ये 'हीट वेव्ह'चा इशारा, उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट

'या' जिल्ह्यामध्ये 'हीट वेव्ह'चा इशारा, उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट

Follow Us
Follow Us:

अमरावती : विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. पुढील काही दिवस ‘हीट वेव्ह’चा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे अमरावती जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. उष्माघाताच्या संभाव्य धोक्याचा विचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) विशेष तीन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. सध्या दुपारच्या वेळेत रस्ते शुकशुकाट दिसत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता जाणवली असल्याने उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! ठेकेदाराकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे धमक्या, स्थायी सदस्यांकडून आरोप; आयुक्तांनाही जुमानत नसल्याची तक्रार

जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांसाठी वॉर्ड क्रमांक १. पुरुषांसाठी वॉर्ड क्रमांक ६, आणि लहान मुलांसाठी वॉर्ड क्रमांक ५ आरक्षित करण्यात आले आहेत. या वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर तत्काळ उपचार करता येतील, अशी व्यवस्था केली गेली आहे. तसेच, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ‘कोल्ड रूम’ वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि लक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्यावेत असे आवाहन केले आहे.

आकड्यातून उघड होते वास्तव

प्रत्येक तालुक्या‌गे सरासरी सुमारे ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहे. ग्रामीण भागांत आरोग्य सुविधा उपलब्ध असल्या तरी उष्णतेच्या वाढत्या संकटात ही संख्या मर्यादित ठरू शकते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामागे सुमारे २८ गावे आहेत. एका केंद्रावर मोठा लोकसंख्येचा ताण वाढत आहे. प्रत्येक आरोग्य पथकावर सुमारे १३८ गावे आहेत. पथकांची संख्या तुलनेने कमी असून तातडीच्या प्रतिसादात अडचणीची शक्यता आहे. वैद्यकीय पथकांची तालुकानिहाय जवळपास प्रत्येक तालुक्यास १ पथक उपलब्धता आहे.

उष्माघातापासून संरक्षणासाठी आरोग्य

विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. उपचारासोबतच जनजागृती आणि कर्मचाऱ्याऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अमरावती डॉ. प्रवीण पारिसे यांनी दिली.

जिल्ह्यात अशी पथके

एकूण तालुके – 14
प्रा. आरोग्या केंद्रे – 59
आरोग्य उपकेंद्रे – ३३९
आरोग्य पथके – १२
वैद्यकीय पथके – १४
एकूण गावे – १६६३
जि. विशेष पथक – 30

Jogeshawari SRA News: जोगेश्वरीतील ‘एसआरए’ प्रकल्पाची १५ दिवसांत चौकशी; मंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

Web Title: Heatwave warning in amravati district health system on alert to prevent heatstroke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • heatwave
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
1

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
2

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
3

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.