मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
अमरावतीमध्ये भाजपच जिंकणार – फडणवीस
फडणवीस यांनी केला भव्य रोड शो
अमरावतीमध्ये करण्यात आला प्रचाराचा शुभारंभ
अमरावती: मनपात यापूर्वीही भाजपची सत्ता राहिली असून आगामी कार्यकाळातही अमरावती महानगरपालिकेत भाजपचाच झेंडा निर्विवाद फडकणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावतीमधील रोड शो ने राजकीय वातावरण चांगलेच सापले. रविवारी (दि. ४) मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पुष्पवर्षावात रोड शोद्वारे झाला.
गाडगेनगर येथील पंचवटी चौकातून या भव्य रोड शो ला सुरुवात झाली. शेगाच नाका चौक, आदर्श हॉटिल चौक, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलांगण रोड मार्गे ही प्रचार रैली साईनगर येथे पोहोचली. यापूर्वी रॅलीचा समारोप अंबादेवी मंदिर परिसरात इराला, संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत केले. अनेक विकाणी आकर्षक रांगोळ्या काडण्यात आल्या होत्या, तर चौकाचौकात पुष्पवृष्टी व फुलांच्या माळांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.
रोड शोमध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने मोटरसायकलवर सहभागी झाले होते. ‘जय श्रीराम’, ‘देवा भाऊ तुम आगे बढ़ी, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या रोड शोमध्ये खा. अनिल बोडे, निवडणूक निरीक्षक आ. संजय कुटे, निवडणूक प्रभारी जयंत डेहनकर, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी खा. नवनीत राणा, आ. प्रताप अडसड, उमेश पावलकर, राजेश वानखडे, प्रविण तायडे, केवलराम काळे, माजी पालवामंत्री प्रवीण पोटे, अॅड. प्रशांत देशपांडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सीपी ओलांनी केले बंदोबस्ताचे नेतृत्व
अमरावती पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी स्वतः रस्त्यावर उतरून बंदोबस्ताचे नेतृत्व केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोड शोच्या अनुषंगाने शहर पोलिसांचा ताफा ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. रोड शो ला सभेच्या स्थळापर्यंत नेण्याकरिता पोलिस सुरक्षेसाठी मोठा बंदोबसत तैनात करण्यात आला होता.
महायुतीच्या ‘या’ शिलेदाराने फडणवीसांबद्दल केले मोठे भाष्य
सातारा जिल्ह्यात नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. आजारी असून देखील मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित नायगाव येथील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






