Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather : पारा ४० पार…! उष्णता वाढल्याने हैराण; थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त

सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे, तर किमान तापमान १९ ते २० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची झळ जाणवू लागली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 14, 2026 | 06:05 PM
पारा ४० पार...! उष्णता वाढल्याने हैराण; थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त

पारा ४० पार...! उष्णता वाढल्याने हैराण; थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त

Follow Us
Follow Us:

अमरावती : विदर्भात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे अमरावतीकरांना उष्णतेच्या लाटेचा तीव्र फटका बसत आहे. भारतीय हवामान विभागाने अमरावती, अकोला व वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला असून, पुढील काही दिवसात वातावरणात बदल होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे, तर किमान तापमान १९ ते २० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची झळ जाणवू लागली असून, दुपारच्यावेळी रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

हवामान अभ्यासक प्रा. अनिल म. बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हिमालयावर पश्चिमी विक्षोभ ट्रफरेषेच्या स्वरूपात सक्रीय आहे. त्यासोबतच चक्राकार वारे वाहत असून, उद्या आणखी १ नवीन पश्चिमी विक्षोभ हिमालयाला धडकण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली. या सर्व हवामान घटकांच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसांत विदर्भातील वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pench Tiger Reserve : वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणार ‘AI’, कसं ते जाणून घ्या…

दुपारी रस्त्यांवरील वर्दळ घटली

दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे जात असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरील वर्दळही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, बाजारपेठाही काही काळ ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

१४ मार्चनंतर हलक्या पावसाची शक्यता

शुक्रवारी हवामान कोरडे आणि उष्ण राहिले असून, शनिवारपासून काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. शनिवारी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रविवारी पूर्व विदर्भ तसेच यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसासह गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता आहे. सोमवारी पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची तर पूर्व विदर्भ व यवतमाळ जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली. बुधवारपर्यंत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही वातावरण ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता असून, गुरुवारपासून पुन्हा कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

शीतपेयांच्या दुकानांवर वाढली गर्दी

उन्हाची तीव्रता वाढताच शहरातील शीतपेय, उसाचा रस, लिंबूपाणी आणि थंड पेयांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक थंड पेयांचा आधार घेत असल्याचे चित्र सर्वत्र
पाहायला मिळत आहे.

सावलीचा आधार शोधत नागरिक

कडक उन्हामुळे नागरिक झाडांची सावली, आडोशाला थांबून विश्रांती घेताना दिसत आहेत. दुचाकीस्वारही रस्त्याच्या कडेला सावली मिळेल त्या ठिकाणी थांबून काही वेळ विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Bhayander News : मानवी वस्तीत मगरीचा मुक्त संचार; मांडवी पाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Web Title: Temperature crossed 40 troubled due to rising heat people of amravati became distressed in search of cooling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • rain

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.