Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था ठप्प

राज्याच्या सांख्यिकी विभागाने नुकताच आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला असून, अमरावती जिल्ह्यासाठी ही आकडेवारी संमिश्र चित्र दर्शवणारी ठरली आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 04, 2026 | 03:02 PM
अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था ठप्प

अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था ठप्प

Follow Us
Follow Us:

जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढून २ लाख १७ हजार ४२९ रुपयांपर्यंत पोहोचले असले, तरी वाढती महागाई आणि मर्यादित रोजगार संधींमुळे या वाढीचा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार, शेतीवर असलेले मोठे अवलंबित्व आणि उद्योगांचा अभाव ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने ठरत आहेत. राज्याच्या सांख्यिकी विभागाने नुकताच आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला असून, अमरावती जिल्ह्यासाठी ही आकडेवारी संमिश्र चित्र दर्शवणारी ठरली आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न २१७४२९ रुपये इतके नोंदवले गेले असले, तरी प्रत्यक्षात ही वाढ सर्वसामान्यांच्या जीवनमानाला अपेक्षित असा आधार देताना दिसत नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्नात फारशी लक्षणीय वाढ झालेली नाही. २०११-१२ च्या तुलनेत दररोज केवळ २३७ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.(फोटो सौजन्य – AI)

पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडणार! अमरावतीमध्ये वसुली कमी, खर्च अधिक; भवितव्यावर काळे ढग

वाढती महागाई आणि उत्पन्नवाढीची ही संथ गती लक्षात घेता, ‘जगावे कसे?’ हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे. जिल्ह्याच्या एकूण विकासदरात (जीडीपी) कृषी क्षेत्राचा वाटा आजही मोठा असला, तरी उद्योगांच्या अभावामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित राहिल्या आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आकडे मोठे भासत असले, तरी रुपयाचे घसरलेले मूल्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे या वाढीचा प्रत्यक्ष फायदा कमी झाल्याचे वास्तव आहे. तथापि, विविध व शासकीय योजनांचा सकारात्मक परिणाम यामुळे यंदा जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात ते वाढ झाल्याचे मानले जात आहे.

टॅक्स कलेक्शनमध्ये अकोला अव्वल; खामगाव दुसऱ्या स्थानावर तर अमरावती विभाग…

प्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण करणे आवश्यक

अमरावतीकरांचे दरडोई उत्पन्न २१७, ४२९ रुपये १० वर्षातील वाढ केवळ ८६ हजार रुपये आहे. जिल्ह्याचा जीडीपी ७० हजार २७ कोटी रुपये आहे. तर यात कृषी क्षेत्राचा वाटा १६६६५ कोटी आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. सततची अतिवृष्टी आणि नापिकीचा फटका शेतीच्या उत्पन्नाला बसत आहे. जिल्ह्यात पंचतारांकित एमआयडीसी असूनही मोठे प्रकल्प न आल्याने रोजगारातून मिळणारे उत्पन्न स्थिर राहिले आहे. उच्चशिक्षित तरुणांचे पुण्या-मुंबईकडे होणारे स्थलांतर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravatikars per capita income of 217 lakhs but helpless in the face of inflation economy stalled due to lack of industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati City
  • maharashtra

संबंधित बातम्या

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
1

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
2

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?
3

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी
4

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.