CM Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस यांनी काल (06 डिसेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देशभरातील भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याचा मला खूप आनंद होताय. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल होता त्याचा आदर झाला आहे याचा आनंद आहे. पण ही जितकी मोठी बाब आहे तेवढीच मोठी जबाबदारीचीही आहे. आता संपूर्ण राज्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी वेगाने पुढे जायचे आहे. विरोधकांनी अनेकदा वैयक्तिक हल्ले केले पण आता कटुता दुर केली नाही तर राज्य पुढे कसं जाणार असा प्रश्नही अमृता फडणवीसांनी उपस्थित केला. तसेच राज्याला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे पुढे जायचे आहे. लाडक्या बहिणींना महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर त्याही सोबत आहेत आणि पुढेही सोबतच राहतील, असही त्यांनी नमुद केलं.
‘डिजिटल स्ट्राईक’ करत व्हॉट्सॲप युजर्सना सरकारचा झटका; तब्बल 59000 अकाउंट ब्लॉक
”समंदर लौटकर आ गया है.’देवेंद्रजी पुन्हा आले आहेत. आता महाराष्ट्राला पुढच्या स्तरावर न्यायचे आहे. खूप काही करायचे आहे. चांगल्या योजना असो, शेतकऱ्यांसाठी, तंत्रज्ञानासाठी, खूप काही करायचे आहे. शेवटी सत्याचा विजय होतो आणि वाईटाचा पराभव होतो.असही त्याने सांगितले.
अमृता फडणवीस म्हणाल्या, सागर आणि वर्षा ही केवळ निवासस्थाने आहेत. पण लोकांच्या मनात राहणे हे वेगळे आहे. देवेंद्रजी कायम त्यांच्या कार्यामुळे लोकांच्या मनात कायम राहतात. एवढेच म्हणेन की आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. ज्या प्रकारे त्यांची फसवणूक झाली, मला खात्री होती की ते पुन्हा एकदा परत येतील आणि योग्य मार्गाने येतील आणि तेच घडले. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
6 डिसेंबरचा इतिहास म्हणजे महापरिनिर्वाण दिन; युगपुरुष बाबासाहेब आंबेडकर यांचा
मुख्यमंत्र्यांसह 20 ते 22 मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यात शपथविधी करण्याची योजना होती. पण महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये खाते वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरून एकमत होऊ शकले नाही. परिणामी, पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी पार पडला. मात्र, आता इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? याबाबतचे सुतोवाच शिवसेना (शिंदे) गटाच्या नेत्यांनी केले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी ठरविण्यात आला आहे. मंत्रिपदासाठी कोणाला संधी द्यायची, खातेवाटप आणि मंत्रिपदांच्या वाटपाचा पेच यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपूर्ण मंत्रिमंडळाचा जंगी शपथविधी करण्याचे नियोजन तूर्तास फिसकटले आहे.
शपथविधीच्या काही वेळापूर्वी शिवसेना (शिंदे) गटाचे नेते भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद झाला होता. तेव्हा त्यांनी इतर मंत्र्यांच्या शपथविधीबद्दल अद्याप आम्हाला कल्पना देण्यात आलेली नाही. पण इतर मंत्र्यांना 11 डिसेंबर रोजी शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला वेळ थोडा कमी असल्याचे म्हटले जात आहे. तेवढ्या वेळेत इतरांचे शपथविधी उरकणार नाहीत. त्यामुळे आज फक्त तिघांना शपथ दिली जाईल. उर्वरित मंत्र्यांना नंतर शपथ दिली जाईल. एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी भाजपाने फेटाळली आहे. त्याबदल्यात भाजपने नगरविकास खाते देण्याची तयारी दर्शविली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महायुतीमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात आले.
विवाह पंचमीच्या दिवशी या लोकांना मिळेल सासरचे पूर्ण सहकार्य