Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हस्तनिर्मित खिडक्यांवर आधारित चित्रप्रदर्शन! १६ ते २१ मार्चदरम्यान कमलनयन बजाज आर्ट गॅलरी येथे आयोजन

लोणावळा परिसरातील सोडून दिलेल्या किवा पाडलेल्या घरांमधून मिळालेल्या अनेक खिडक्या विशेषतः कोविडनंतर या प्रदर्शनाचा मुख्य भाग आहेत. काही खिडक्या देसाई यांनी स्वतः पुनर्वापरित आणि शाश्वत लाकडपासून तयार केल्या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2026 | 02:08 PM
हस्तनिर्मित खिडक्यांवर आधारित चित्रप्रदर्शन! १६ ते २१ मार्चदरम्यान कमलनयन बजाज आर्ट गॅलरी येथे आयोजन

हस्तनिर्मित खिडक्यांवर आधारित चित्रप्रदर्शन! १६ ते २१ मार्चदरम्यान कमलनयन बजाज आर्ट गॅलरी येथे आयोजन

Follow Us
Follow Us:

खिडकीमध्ये एक शांत पण प्रभावी अशी ताकद असते. ती ना आपल्याला बंदिस्त करते, ना पूर्णपणे बाहेर घेऊन जाते; ती फक्त आपल्याला पाहण्याची, थांबण्याची आणि अंतर्मन व बाह्य जगाच्या दरम्यान श्वास घेण्याची एक जागा देते. ‘द पेंटेड विंडो’ या त्यांच्या पाचव्या एकल प्रदर्शनामध्ये बहुपुरस्कारप्राप्त समकालीन कलाकार नंदिता देसाई यांनी या साध्या वास्तुशिल्प घटकाला कलाकृतींच्या केंद्रस्थानी आणले आहे. विंटेज आणि हस्तनिर्मित खिडक्यांना त्यांनी कलाकृतींचे रूप दिले आहे. हे प्रदर्शन १६ ते २१ मार्चदरम्यान मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कमलनयन बजाज आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सुमारे ५० कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. या खिडक्या जणू बाहेरच्या जगाकडे पाहण्याची आणि अंतर्मनातील आठवणी व चिंतनाकडे वळण्याची संधी देतात. या प्रदर्शनाची कल्पना एका योगायोगातून सुचली. लोणावळा-खंडाळा रस्त्यावरून गाडीने जात असताना देसाई यांच्या नजरेस अचानक सूर्यप्रकाशात चमकणारे रंगीत कोरीव काचेचे तुकडे दिसले. त्या थांबल्या आणि त्यांना तिथे एका जुन्या घरातून उरलेल्या टाकून दिलेल्या खिडक्यांचा संग्रह दिसला.(फोटो सौजन्य – AI)

पाच वर्षांनी वनराणी पुन्हा धावली! बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी आनंदाची सफर

जीवनाचे रुपक

लोणावळा परिसरातील सोडून दिलेल्या किवा पाडलेल्या घरांमधून मिळालेल्या अनेक खिडक्या विशेषतः कोविडनंतर या प्रदर्शनाचा मुख्य भाग आहेत. काही खिडक्या देसाई यांनी स्वतः पुनर्वापरित आणि शाश्वत लाकडपासून तयार केल्या आहेत. लहानपणी वारंवार घर बदलल्यामुळे देसाई याच्या आठवणी घरातील खोल्यांपेक्षा खिडकीजवळ घालवलेल्या क्षणाशी जोडलेल्या आहेत. वाचन करणे, बाहेरचे जग पाहत बसणे किया धाचा ग्लास संपवण्याची धडपड! त्या म्हणतात, माझ्यासाठी खिडकी म्हणजे अंतर्मन आणि बाह्य जग यावर विचार करण्याची जागा आहे. ती जीवनाचे रूपक आहे. दोन्ही जगांमध्ये समतोल राखण्याची आणि आपण ज्या सुंदर जगात राहतो त्याचे कौतुक करण्याची, आपल्या छोट्या चौकटीत अडकून न घडण्याची.

LPG Crisis: मुंबईत ‘गॅस माफिया’ सक्रिय! पोलिसांनी १७२ सिलिंडर जप्त करत काळाबाजार उधळला

धीमी आणि मेहनतीची प्रक्रिया; वर्षापासून तयारी

या प्रदर्शनात विविध साहित्य आणि तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. विशेष काचेच्या रंगानी रंगवलेले काच, नैसर्गिक ऑक्साइड पॉलिश, स्टेन, वार्निश, वॅक्स क्रेयॉन्स आणि शेलॅक वापरून तयार केलेले लाकूड, तसेच ज्यूट आणि हेम्पवर तेलरंग, अॅक्रिलिक आणि पेस्टल्स वापरून तयार केलेल्या कलाकृती या सर्वांमधून देसाई यांचे नैसर्गिक साहित्यांवरील प्रेम दिसून येते, जुन्या लाकूड आणि काचेवर चित्र काढणे कॅनव्हासवर चित्र काढण्यापेक्षा खूप वेगळे असते. प्रत्येक खिडकीवर काम करण्यापूवीं मोठी तयारी करावी लागते, स्वच्छता, कीटकनियंत्रण, अतिरिक्त भाग काढून टाकणे आणि त्याच वेळी तिची मूळ रचना, रंग आणि वैशिष्ट्य जपणे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: An exhibition based on handmade windows organized at kamalanayan bajaj art gallery from 16th to 21st march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Art Exhibition
  • art festival
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
1

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
2

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
3

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
4

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.