Crime News: राज्यात सध्या वैष्णवी हगवणेचे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सासरच्यांनी केलेल्या छळामुळे वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी पुणे येथील दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत वाढ केली. यामध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नंनद करिश्मा यांचा समावेश आहे. फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यानंतर आज कस्पटे कुटुंबाने पत्रकार परिषद घेतली आहे.
पुण्यातील भूकुम गावतील हगवणे कुटुंबाच्या छळापायी आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या आरोपींना बुधवारी (28मे) कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता तपासाला नवे वळण आले आहे. कोर्टात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे.
अनिल कस्पटेंचा गौप्यस्फोट काय?
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. आज त्यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. हगवणे कुटुंबाने दोन वेळेस वैष्णवीचे लग्न मोडले. मला नाईलाजाने माझ्या मुलीचे लग्न हगवणे कुटुंबात करून द्यावे लागले. फॉर्च्युनर मी स्वताहून दिली नव्हती. त्यांनी माझ्या मुळीच छळ करून गाडी मागितली.
आरोपींकडे 5 कोटींच्या गाड्या नाहीत. त्यांच्याकडे एकच गाडी आहे. मी दिलेली. वैष्णवीवर काहीही आरोप करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका. पत्रकार परिषदेत बोलताना वैष्णवीच्या वडिलांना आपले अश्रू अनावर झाले होते.
हगवणेंच्या वकिलांच्या युक्तिवादात वैष्णवीच्या इभ्रतीला धक्का
वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडले. त्याची माहिती आम्हाला हवी होती. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती, तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. नको त्या व्यक्तीने नाही म्हटले म्हणून तिने आत्महत्या केली असावी. आत्महत्या करण्याचे मुख्य कारण वेगळे आहे, त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे, असे हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी म्हटले आहे.
हगवणेच्या वकिलांचा उलटा हल्ला: ‘ती नको त्या व्यक्तीसोबत…’; युक्तिवादात वैष्णवीच्या इभ्रतीला धक्का
पोलीस कोठडीची गरज नाही – हगवणेंचे वकील
पोलीस कोठडी देण्याची काहीच गरज नाही आहे. गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे, हे हगवणे कुटुंबाने आधीच सांगितले आहे. निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचे असून, त्याचा यात काहीच संबंध नाही. तो फक्त हगवणे यांचा नातेवाईक आहे. त्याने बाळाला सांभाळताना हेळसांड केली म्हणून त्यावर गुन्हा दाखल केला. तो चुकीचा असेल, तर त्याला फाशी द्या, असे हगवणेंच्या वकिलाने म्हटले आहे.
४० लाख रुपयांची गाडी दिली असे ते (वैष्णवीच्या माहेरचे) म्हणतात. आमच्या घरात ५ कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला त्रास देऊ, असे म्हणत हगवणे कुटुंबाची बाजू त्यांचे वकील विपुल दोशी यांनी मांडली आहे. चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा, म्हणून तिने आत्महत्या केली असावी. असा दावा दोशी यांनी केला आहे.