
इमारतींची छते आणि साकूड येथील प्रक्षेत्राचा पहिल्या टप्प्यात समावेश
यावेळी पशुसंवर्धन मंत्री मुंडे म्हणाल्या की, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे भविष्यात पशुसंवर्धन विभागातील सर्व इमारतींचे वीज बिल शून्यावर आणून अतिरिक्त वीज निर्मिती करून त्या विक्रीतून विभागाचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा सामंजस्य करार महत्वाचा ठरणार आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची उपकंपनी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडने (महाप्रीत) पशुसंवर्धन विभागाच्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यास स्वारस्य दर्शविले आहे. कंपनीने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर याबाबत सादरीकरण केले.
विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी इमारतींच्या छतांवरील जागेची उपलब्धता, प्रक्षेत्रांचे स्थळ सर्वेक्षण आणि व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे. विस्तृत प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय परिसरातील कार्यालयीन इमारतींच्या छतांवर तसेच साकूड, (ता. अंबेजोगाई, जि. बीड) येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या अधिपत्याखालील प्रक्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
पशुसंवर्धन“पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना…”; मंत्री पंकजा मुंडेंची माहिती
पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिस
चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई क्लायमेट वीकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.
Ans: पशुसंवर्धन विभागातील सर्व इमारतींचे वीज बिल शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Ans: विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी इमारतींच्या छतांवरील जागेची उपलब्धता, प्रक्षेत्रांचे स्थळ सर्वेक्षण आणि व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे.