Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कागल तालुक्यातील 83 गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 तर…

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. मात्र, सोमवारी झालेल्या सोडतीमध्ये एकही महिला उपस्थित नव्हती. महिलांसाठी आरक्षण असूनही महिलांची अनुपस्थितीची चर्चा होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 22, 2025 | 01:33 PM
कागल तालुक्यातील 83 गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 तर...

कागल तालुक्यातील 83 गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 तर...

Follow Us
Follow Us:

कागल : कागल तालुक्यातील 83 गावांच्या सरपंचपदासाठी बहुउद्देशीय सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १२, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २२ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४९ ठिकाणी आरक्षण काढण्यात आले.

महिला सरपंचपदासाठी एकूण ४१ गावे आरक्षित करण्यात आली. २०२५-३० या काळातील सरपंचपदाचे चक्रानुक्रमे सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित गावे अशी आहेत. त्यात भडगाव, सावर्डे खुर्द, हसुर खुर्द, पिंपळगाव बुद्रुक, यमगे, माद्याळ (स्त्री) आरक्षण, हमिदवाडा, तमनाकवाडा, बेनिग्रे, दौलतवाडी, अर्जुनवाडा, बाळेघोल ही आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गात महिलांसाठी आरक्षण असून, त्यामध्ये सोनगे, मेतके, वाळवे खुर्द, कौलगे, लिंगनूर कापशी, बानगे, बोळावी, कासारी, कुरणी, वडगाव, चिमगाव या गावांचा समावेश आहे.

हेदेखील वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचे नाव उपराष्ट्रपतिपदासाठी चर्चेत; अधिवेशनातच नवीन उपराष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता

याशिवाय, सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. त्यामध्ये मळगे बुद्रुक, कुरुकली, बाचणी, बस्तवडे, निढोरी लिंगनूर दुमाला, सावर्डे बुद्रुक, बोरवडे, करड्याळ, सुरूपली, गलगले, मुगळी, म्हाकवे, गोरंबे, मळगे खुर्द, कापशी सेनापती व बाळीक्रे, नंद्याळ, आलाबाद, हसुर खुर्द, शिंदेवाडी, शंकरवाडी, फराकटेवाडी, अवचितवाडी, ठाणेवाडी.

सर्वसाधारण प्रवर्ग महिला आरक्षण

व्हन्नूर, बिद्री, बेलवडे बुद्रुक, चिखली, अर्जुनी, बेलवळे खुर्द, सिद्धनेर्ली, उंदरवाडी, मौजे सांगाव, रणदिवेवाडी, हळदी, व्हनाळी, बेलेवाडी मासा, केंबळी, करंजिवणे, सोनाळी, शेंडूर, जैन्याळ, मांगनूर, हळदवडे, बोळावीवाडी, सुळकुड, आणूर, खडकेवाडा. आरक्षण सोडतीवेळी निवडणूक नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, मंडल अधिकारी प्रशांत गुरव, दिगंबर कांबळे, सुनील खेडकर, मृगेंद्र हळबे, रीमा बाटुंगे, संदीप काळे, आर आर पाटील आदी उपस्थित होते.

आरक्षणासाठी महिलांना 50 टक्के आरक्षण

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. मात्र, सोमवारी झालेल्या सोडतीमध्ये एकही महिला उपस्थित नव्हती. महिलांसाठी आरक्षण असूनही महिलांची अनुपस्थितीची चर्चा होती. मानसी मगदूम आणि हर्षद पाटील या लहान मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

Web Title: Announcement of reservation for the post of sarpanch of 83 villages in kagal taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?
1

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका
2

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
4

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.