मुंबईः मुंबईतील लालबाग परिसरातील अविघ्ना पार्क या सोसायटीतील इमारतीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहेत. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तसेच काही बायरबंब घटनास्थळी दाखल झालेत. दरम्यान, या इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आग लागल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचण येत आहे. तर या इमारतीमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लालबागमधील अविघ्ना पार्क इमारतीमध्ये पुन्हा अग्नितांडव
अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
अनेक लोक अडकल्याची भीती
मागील वर्षा याच इमारतीत आग लागली होती
फायर ऑडिट व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईत आगीचा घटना वारंवार@navarashtra pic.twitter.com/8P9XtwZRFE
— Amrut Bharmu Sutar (@amarsutar9) December 15, 2022
मागील वर्षी देखील या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आग लागली होती, आग २५ व्या मजल्यापर्यंत आगीचे लोट पोहोचले होते. दरम्यान, या आगीच्या वेळी आपला जीव वाचविण्यासाठी सुरक्षा रक्षकाने 19 व्या मजल्यावर उडी मारली होती. यात या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. पुन्हा एकदा या इमारतीला आग लागल्यामुळं फायर ऑडिचा तसेच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.