Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: १३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती, प्रताप सरनाईक यांच्या सूचना

अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे, प्रताप सरनाईक यांच्या सूचना पात्र उमेदवाराला लवकरात लवकर नोकरी देऊन त्याला आर्थिक स्थैर्य कसे मिळेल हे पाहण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2025 | 06:37 PM
१३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती, प्रताप सरनाईक यांच्या सूचना (फोटो सौजन्य-X)

१३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती, प्रताप सरनाईक यांच्या सूचना (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची अत्यंत गरज असते. अशावेळी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून संबंधित पात्र उमेदवाराला लवकरात लवकर नोकरी देऊन त्याला आर्थिक स्थैर्य कसे मिळेल हे पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

दुध उत्पादक शेतकरी मेळावा उत्साहात पार; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला शेतकऱ्यांवर विश्वास

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात ७० उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याच्या समारंभात ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह उमेदवारांचे कुटुंबीय व एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात शासनाच्या धर्तीवर रा.प. सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी मृत झाल्यास त्यांच्या अवलंबितांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे.

त्यानुसार सन २०१६ पासून प्रलंबित असलेले अनेक अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले आहेत. या बरोबरच विभागीय स्तरावर आणखी ६६ उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अनुकंपा तत्त्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. अशा रीतीने वाहतूक निरीक्षक, प्रभारक, लेखाकार, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, लिपिक-टंकलेखक अशा विविध पदांवर तब्बल १३६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर एसटी महामंडळाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यात आले आहे.

एसटीच्या सहाव्या प्रादेशिक विभागाची निर्मिती

निर्णयाचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर प्रशासकीय गतिमानता आणण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एकूण सहा प्रादेशिक विभागामध्ये विभाजन करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने हे विभाग निर्माण करण्यात आले असून सहावा नाशिक प्रादेशिक विभाग निर्माण करण्याची मंजुरी एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.

Ganeshotsav 2025: ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’…; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Web Title: Appointment of 136 candidates in the st corporation instructions from pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार, या महिन्याचा पगार आधीच मिळण्याची शक्यता
1

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार, या महिन्याचा पगार आधीच मिळण्याची शक्यता

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई
2

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका
3

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
4

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.