Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झाला प्रयत्न, वाचा नेमकं काय घडलं…

या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 24, 2023 | 12:52 PM
अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झाला प्रयत्न, वाचा नेमकं काय घडलं…
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर – कोल्हापूरमधून (Kolhapur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या (Sucide) केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तसेच या आत्महत्येमुळं वेगवेगळे तर्क काढले जाताहेत. तसेच पोलीस देखील याचा पुढील तपास करताहेत. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला असावा, असं बोललं जात आहे.

नेमकं काय घडलं?

मागील काही दिवसांपासून संतोष शिंदे तणावात होते. तसेच त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणामुळे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. यामुळेच त्यांनी तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी संतोष शिंदे यांच्या बेडरूमचे दार न उघडल्याने त्याच्या आई यांनी शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडरुममध्ये तिघांचेही मृतदेह आढळून आले. त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष शिंदे यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपताना परप्रातीयांना मोठी मदत केली होती. त्यामुळे उद्योगात नाव कमवून सामाजिक योगदान देणाऱ्या संतोष शिंदेंचा अत्यंत शेवट भयावह झाला आहे.

काय आहे सुसाईट नोटमध्ये?

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार संतोष शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ती नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पुढील तपास पोलीस करताहेत. संतोष शिंदे याच्या मानेवरही जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून अंत केला. असा अंदाज लावला जात आहे. संतोष शिंदे हे गडहिंग्लज शहरात राहयला होते. एका उमद्या उद्योगपतीने अशा भयावह पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Arjun udyog group santosh shinde committed suicide with his family an attempt was made to implicate him in a false crime read what actually happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2023 | 12:52 PM

Topics:  

  • kolhapur
  • आत्महत्या

संबंधित बातम्या

Kolhapur News: सोशल मीडियावर ओळख! आई बापाला सोडून मुलगी निघाली प्रियकराला भेटायला; हातकणंगले मध्ये घडला पिक्चर सीन
1

Kolhapur News: सोशल मीडियावर ओळख! आई बापाला सोडून मुलगी निघाली प्रियकराला भेटायला; हातकणंगले मध्ये घडला पिक्चर सीन

Kolhapur News : पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ
2

Kolhapur News : पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
3

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू
4

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.