Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

आमची लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध आहे. देशातील वाढती महागाई आणि भ्रष्टाचार पाहता महायुती सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे," असा थेट घणाघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2026 | 04:55 PM
संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, 'महायुती' सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, 'महायुती' सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात
  • ‘महायुती’ला हद्दपार करण्याची वेळ
  • खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात
कोल्हापूर : “पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार सुशिक्षित आणि प्रगल्भ असून तो विचारपूर्वक मतदान करेल याची मला खात्री आहे. सध्या संविधानाने दिलेला मताचा अधिकारच धोक्यात आला असून ही परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी एक होण्याची गरज आहे. आमची लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध आहे. देशातील वाढती महागाई आणि भ्रष्टाचार पाहता महायुती सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे,” असा थेट घणाघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. खासदार सुळे पुढे म्हणाल्या, “आपला उमेदवार हा तुमची विचारधारा मानणारा आणि प्रश्नांची जाण असणारा असावा. जंतरमंतरवर लढणारी नवी पिढी जात-पात व लिंगभेद न मानता केवळ जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आहे. तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्याची ताकद असणाऱ्या हर्षदा देशमुख-जाधव व जयंत आसगावकर यांना निवडून द्यावे.”

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, “ही निवडणूक केवळ दोन आमदारांना निवडून देण्याची नसून पुरोगामी विचार आणि कर्मवीर अण्णांना अभिप्रेत असलेली शिक्षण व्यवस्था टिकवण्याची आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांचा इतिहास बदलण्याचा व चुकीचा इतिहास सोशल मीडियावरून पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आपण वैचारिकदृष्ट्या सजग राहून मतदान केले नाही, तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही.”

उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, “शिक्षकांना अशैक्षणिक कामांत व्यस्त ठेवल्यामुळे शिक्षणाची हेळसांड होत आहे. डिजिटल इंडियाच्या बाता मारल्या जात असल्या तरी शाळा डिजिटल पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. पटसंख्येच्या अटीमुळे शिक्षक संख्या घटत असून पेपरफुटीमुळे सामान्य पदवीधरांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. या सर्व अन्यायाविरुद्ध महाविकास आघाडी रस्त्यावरची लढाई लढत आहे. या लढाईला बळ देण्यासाठी मला आपले बहुमोल मत देऊन विजयी करा.” या बैठकीस सरोज ऊर्फ माई पाटील, व्ही. बी. पाटील, एम. बी. शेख, भरत रसाळे, संगीता पाटील, प्रभाकर देशमुख यांच्यासह पदवीधर व शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी घेतला प्रचार यंत्रणेचा आढावा

मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रचार यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. “कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सजग राहून मतदारांपर्यंत पोहोचावे. मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्यास सज्ज आहेत, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून मतदानाचे आवाहन करायचे आहे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा : खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

हर्षदा देशमुख-जाधव यांचा कोल्हापुरात झंझावात

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्याकडून कोल्हापुरात जोरदार प्रचार सुरु आहे. दिवसभरात त्यांनी भारती विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि काँग्रेस कमिटी येथे भेटी देऊन मतदार व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर काय टीका केली?

    Ans: वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख करत महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

  • Que: सुप्रिया सुळे यांच्या मते सध्याची प्रमुख चिंता कोणती?

    Ans: संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार धोक्यात असल्याचे सांगत त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.

  • Que: पदवीधर आणि शिक्षक मतदारांकडून सुप्रिया सुळे यांना काय अपेक्षा आहे?

    Ans: पदवीधर आणि शिक्षक मतदार सुशिक्षित व प्रगल्भ असून ते विचारपूर्वक मतदान करतील, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

Web Title: Mp supriya sule has criticized the mahayuti government nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Election News
  • kolhapur
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
1

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ
2

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश
4

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.