Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपत्कालीन परिस्थितीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज; दहा सॅटेलाईट फोनची केली व्यवस्था

हा फोन जो थेट पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांशी संवाद साधून कॉल किंवा मेसेज पाठवतो. सामान्य मोबाईल फोन मोबाइल टॉवर्सवर अवलंबून असतो. पण सॅटेलाईट फोनला मोबाईल टॉवरची गरज लागत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2025 | 01:43 PM
आपत्कालीन परिस्थितीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज; दहा सॅटेलाईट फोनची केली व्यवस्था

आपत्कालीन परिस्थितीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज; दहा सॅटेलाईट फोनची केली व्यवस्था

Follow Us
Follow Us:

पुणे : आपत्ती अथवा आणीबाणीच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाचा संपर्क कायम राहावा यासाठी पुणे जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयांमध्ये सॅटेलाईट फोन सज्ज ठेवण्यात आले आहेत. दुर्गम, दरडग्रस्त तसेच पूरप्रवण भागांमध्ये नेहमीच मोबाईल नेटवर्कची अडचण निर्माण होते. त्यामुळे दुर्घटना घडल्यावर माहिती वेळेवर प्रशासनाकडे पोहोचत नाही आणि मदत कार्यात विलंब होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

सॅटेलाईट फोन थेट उपग्रहांशी संपर्क साधून काम करतो. त्यामुळे कोणतेही मोबाईल नेटवर्क नसले तरी संवाद साधता येतो. सॅटेलाईट फोनवरून मोबाईल व लँडलाईन नंबरवर थेट संपर्क साधता येतो, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर, बारामती आणि दौड या १० तहसील कार्यालयांमध्ये सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यामध्ये विशेषतः दौड आणि बारामती हे पूरप्रवण तालुके असून, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात या भागांतील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अशा वेळी सॅटेलाईट फोनमुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क राखणे शक्य होते. मान्सून काळात भटकंतीसाठी जुन्नर ते भोर या पट्ट्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. तसेच पालखी सोहळे, उत्सव, डोंगरदऱ्यांतील यात्रा आणि दरड कोसळण्याच्या घटनाही घडतात. या पार्श्वभूमीवर सदर तालुक्यांमध्ये सॅटेलाईट फोनची उपलब्धता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

काय आहे सॅटेलाईट फोन?

हा फोन जो थेट पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांशी संवाद साधून कॉल किंवा मेसेज पाठवतो. सामान्य मोबाईल फोन मोबाइल टॉवर्सवर अवलंबून असतो. पण सॅटेलाईट फोनला मोबाईल टॉवरची गरज लागत नाही. या फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकते त्याच कारण म्हणजे हा फोन सतत सिग्नल शोधत नाही. सामान्य फोनपेक्षा सॅटेलाईट फोन व सेवा दोन्ही महाग असते. मात्र, सॅटेलाईट फोन खरेदी व वापरासाठी शासनाची विशेष परवानगी आवश्यक असते.

Web Title: Arrangements have been made for ten satellite phones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी
1

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
2

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
3

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा
4

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.