Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: कपातील चहाचा रंग कृत्रिम! एफडीएच्या कारवाईत ९०० किलो चहा, १७ किलो रंग जप्त; गुन्हा दाखल

अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल रोडवरील अन्न व औषध प्रशासनाने छापेमारी करत १७ किलो संशयित रंगासह तब्बल २.१८ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. यात चहा अधिक आकर्षक दिसावा म्हणून रंग मिक्स केल्याचे दिसून आले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2026 | 11:00 AM
कपातील चहाचा रंग कृत्रिम! एफडीएच्या कारवाईत ९०० किलो चहा, १७ किलो रंग जप्त; गुन्हा दाखल

कपातील चहाचा रंग कृत्रिम! एफडीएच्या कारवाईत ९०० किलो चहा, १७ किलो रंग जप्त; गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

सकाळच्या चहाच्या कपातून ताजेपणा नव्हे तर रासायनिक भेसळ पोटात जात असल्याचे धक्कादायक वास्तव अंधेरीत उघड झाले आहे. चहा अधिक आकर्षक दिसावा यासाठी त्यात रंग मिसळून विक्रीसाठी तयार केला जात असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत समोर आला. या कारवाईत ९०० किलो चहा पावडर आणि १७ किलो संशयित रंगासह तब्बल २.१८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – AI/istock)

मुंबईकरांना दिलासा! पावसाळ्यात लोकलचा खोळंबा टळणार, सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्सवर बसणार लोखंडी कवच

एफडीएला मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल रोडवरील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष एका व्यक्तीस चहा पावडरमध्ये रंग आणि पाण्याचे मिश्रण मिसळताना पकडले. प्लास्टिकच्या टबमध्ये हे मिश्रण एकजीव करून मोठ्या प्रमाणात चहा तयार केला जात असल्याचे दिसून आले. यावेळी कोणतेही लेबल नसलेले केशरी रंगाच्या पावडरचे डबेही आढळून आले. तसेच भेसळीसाठी वापरण्यात येणारा कच्चा मालही मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आला होता.

हा भेसळयुक्त माल बाजारात जाण्यापूर्वीच एफडीएने कारवाई करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासार्ट पाठविले असून उर्वरित माल जप्त करून सील करण्यात आला आहे. तपासात संबंधित आस्थापनाकडे एफएसएसएआयचा वैध परवाना नसल्याचेही उघड झाले. त्यामुळे परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीपाद धरणगुत्ती, ऋतुजा जाधव आणि रामू माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सिडकोमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! विजय सिंघल यांची बदली; अश्विन मुद्गल नवे व्यवस्थापकीय संचालक

विनापरवाना डेअरीला ‘स्टॉप बिझनेस नोटीस’

अन्न व औषध प्रशासनाने मुलुंड (पश्चिम) येथील विनापरवाना चालणाऱ्या एका डेअरीवर छापा टाकून मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित डेअरीला तात्काळ ‘व्यवसाय बंद’ करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मुलुंड (पश्चिम) येथील डॉ. आर. पी. रोडवरील वृतिक डेअरीची तपासणी केली असता, आवश्यक अन्न सुरक्षा परवाना अथवा नोंदणी न घेता व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत एकूण १३ हजार ८१३ रुपयांचा मुदतबाह्य साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत कलम ३१(१), २६ आणि २७ चे उल्लंघन झाल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत एफडीएने कलम ३२ अंतर्गत संबंधित डेअरीला ‘स्टॉप बिझनेस नोटीस’ बजावली असून आवश्यक परवाने आणि कायदेशीर पूर्तता होईपर्यंत व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश दर्शनवाड, छत्रपाल सिंह राजपूत आणि आकाश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Artificial color in the tea 900 kg of tea and 17 kg of coloring agent seized in fda raid case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Food Safety
  • Mumbai News
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
2

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
3

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
4

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.