Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाची बातमी ! म्हाडाकडून बांधली जाणार तब्बल 19497 घरे; ‘अशी’ असते अर्ज प्रक्रिया…

मुंबई आणि कोकण मंडळांसोबतच, म्हाडाने नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथे घरे बांधण्याची योजना आखली आहे. मुंबईतील घरांची मागणी लक्षात घेऊन, म्हाडाने मुंबई मंडळाची विशेष काळजी घेतली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2025 | 12:30 PM
आनंदाची बातमी ! म्हाडाकडून बांधली जाणार तब्बल 19497 घरे; 'अशी' असते अर्ज प्रक्रिया...

आनंदाची बातमी ! म्हाडाकडून बांधली जाणार तब्बल 19497 घरे; 'अशी' असते अर्ज प्रक्रिया...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यानुसार, अनेक प्रयत्नही केले जातात. पण, घरांच्या वाढत्या किमतीमुळे घराचं स्वप्न हे स्वप्नच राहून जातं. मात्र, आता तुम्हाला यातून मोठा आधार मिळणार आहे. कारण, म्हाडाकडून तब्बल 19497 घरे बांधली जाणार आहेत. त्यात म्हाडाचे मुंबई बोर्ड नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 5749.49 कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबई आणि कोकण मंडळांसोबतच, म्हाडाने नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे घरे बांधण्याची योजना आखली आहे. मुंबईतील घरांची मागणी लक्षात घेऊन, म्हाडाने मुंबई मंडळाची विशेष काळजी घेतली आहे. घर बांधणीसाठी देण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी सुमारे 36 टक्के रक्कम मुंबईत घरे बांधण्यासाठी ठेवण्यात आली आहे. म्हाडाने अर्थसंकल्पात राज्यभरात 19497 घरे बांधण्याची योजना आखली आहे.

मुंबई तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड, विरार येथे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कोकण मंडळाने 2025-26 मध्ये 9902 घरे बांधण्याची योजना आखली आहे. ही घरे बांधण्यासाठी कोकण मंडळाकडून 140.85 कोटी रुपये खर्च केले जातील.

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) पुढील एका वर्षात मुंबईत 5199 घरे बांधणार आहे. म्हाडाचे मुंबई बोर्ड नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 5749 कोटी रुपये खर्च करणार आहे. वाढत्या मालमत्तेच्या किमतींमध्ये नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी, म्हाडाने 2024-25 चा सुधारित अर्थसंकल्प आणि 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. त्यात ही तरतूद करण्यात आली आहे.

जोगेश्वरी पूर्वसाठी 350 कोटी रुपये

जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी 205 कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी 573 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्वेतील पीएमजीपी कॉलनी प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये, वांद्रे पश्चिमेतील परिधान खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी 205 कोटी रुपये, गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर येथे घरे बांधण्यासाठी 573 कोटी रुपयांची तरतूद आहे.

विरार बोळींज येथे क्लब हाऊस

विरार बोळींज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करण्याच्या कामासाठी ३३.८५ कोटी रुपये, वर्तकनगर-ठाणे पोलिस वसाहत इमारतींचा पुनर्विकास कामासाठी ९० कोटी रुपये, गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेसाठी ११५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण

नागपुर मंडळांतर्गत चंद्रपुर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी ३७१.२० कोटी रुपये, टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी ३५० कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

ठाण्यात होणार हेल्थ केअर सेंटर

कोकण मंडळांतर्गतच्या पाचपाखाडी-ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केअर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी १५ कोटी रुपये, माजिवाडे-ठाणे विवेकानंद नगर येथे १०० बेडचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणीसाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पुण्यात उभारणार १८३६ सदनिका

पुणे मंडळाअंतर्गत १८३६ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५८५.९७कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागपूर मंडळाअंतर्गत ६९२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी १००९.३३ कोटींची तरतूद केली आहे.

अशी असेल अर्ज प्रक्रिया…

  • म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ housing.mhada.gov.in ला भेट द्या.
  • नोंदणी करा : जर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल, तर नोंदणी करा.
  • लॉग इन करा : तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि पासवर्डने लॉग-इन करा.
  • अर्ज करा : तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, ती योजना निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा : आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • फी भरणा : अर्ज शुल्क भरा.
  • अर्जाची प्रत डाउनलोड करा : अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर, त्याची प्रत डाउनलोड करा आणि जपून ठेवा.

Web Title: As many as 19497 houses will be built by mhada nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • maharashtra news
  • MHADA Houses
  • mumbai house

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
2

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
3

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा
4

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.