Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यात आशा स्वयंसेविकांचा ‘काळा दिवस’; सहा महिन्यांपासून मानधन थकीत, जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने

आशा वर्कर्स युनियनच्या वतीने बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करत ''काळा दिवस'' पाळण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून सोडत आशा सेविकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 07:01 PM
साताऱ्यात आशा स्वयंसेविकांचा ‘काळा दिवस

साताऱ्यात आशा स्वयंसेविकांचा ‘काळा दिवस

Follow Us
Follow Us:

 

  • साताऱ्यात आशा स्वयंसेविकांचा ‘काळा दिवस’
  • सहा महिन्यांपासून मानधन थकीत
  • जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने
सातारा / प्रतिनिधी: सहा महिन्यांपासून थकीत मानधन, वाढता आर्थिक ताण आणि कामगारविरोधी धोरणांविरोधात आज बुधवारी साताऱ्यात आशा आरोग्य सेविकांनी संतप्त आंदोलन छेडले. आशा वर्कर्स युनियनच्या वतीने बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करत ”काळा दिवस” पाळण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून सोडत आशा सेविकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली.

या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारकडून गेल्या सहा महिन्यांपासून आशांचे मानधन थकीत ठेवण्यात आले आहे. यामुळे अनेक आशा सेविकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून त्यांच्या कुटुंबीयांवरही आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच कामगारविरोधी चार श्रम संहितांच्या निषेधार्थ देशभरात आज हा काळा दिवस पाळण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान आशा सेविकांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

Unseasonal Rain In Maharashtra: आता काही खरं नाही…! राज्यात ‘या’ दिवशी वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

केंद्र सरकारने थकीत असलेले सहा महिन्यांचे मानधन तात्काळ द्यावे, दर महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत नियमित मानधन अदा करावे, वेतन चिठ्ठी देण्यात यावी, विनामोबदला कामे देऊ नयेत, दिवसभर ठराविक भागात थांबण्याची सक्ती करू नये, विविध कारणांवरून मोबदल्यात कपात करू नये, तसेच आभा कार्ड, दिव्यांग सर्वे, वयोश्री योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांची थकित बिले त्वरित द्यावीत. याशिवाय आशा सेविकांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, मंजूर मोबाईल भत्ता ३०० रुपये तात्काळ अदा करावा, निवृत्ती वय ६५ वर्षे करावे आणि केंद्र सरकारने जाहीर केलेली १५०० रुपयांची मानधनवाढ त्वरित लागू करावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात कॉम्रेड आनंदी अवघडे, रूपाली पवार, राणी कुंभार, प्रतिभा बनसोडे, दिपाली जाधव, अमिता सरतापे, विद्या कांबळे, शीला साळुंखे, निर्मला रिटे, आशा बोराटे, सुप्रिया कांबळे यांच्यासह अनेक आशा सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

Mhaswad News: म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन; महिलांना मिळणार विशेष भेट

Web Title: Asha workers stage massive protest outside zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Asha Workers
  • Satara News
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
2

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
3

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
4

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.