म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य 'हिंदू संमेलना'चे आयोजन
सकल हिंदू समाज, म्हसवड मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात विविध धार्मिक, सामाजिक व विचारप्रवर्तक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. हिंदू संस्कृतीचा गौरव, परंपरा आणि एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून योगी वृषभ नाथगिरी महाराज (जनरल थानापती, पंच दशनाम आवाहन आखाडा, उज्जैन) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कराड येथील श्री. विजयराव जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भाषणातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला जाणार असून उपस्थितांना प्रेरणादायी विचार मिळणार आहेत.
कावडी गाव ठरणार राज्यासाठी ‘रोल मॉडेल’; ५ कोटींच्या बक्षिसाची नामदार शिवेंद्रसिंहराजेंना खात्री!
म्हसवड व परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी कुटुंबासह या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे सामाजिक एकोपा वाढण्यास आणि हिंदुत्व विचारांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या भव्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून, शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी म्हसवड शहरातील सर्व हिंदु समाजाने उपस्थित रहावे यासाठी सकल हिंदु समाजातील कार्यकर्ते हे घरोघरी जावुन नागरीकांना आवाहन करीत असुन यामध्ये सहभागी होणार्या महिलांना मोफत साडी भेट म्हणुन दिली जाणार असल्याचे आयोजकांकडुन सांगण्यात येत आहे.






