Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढीसाठी एसटीची मेगा तयारी, ५,५०० विशेष बस धावणार; ४० भाविक जमवा, गावातून थेट पंढरपूर गाठा; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५,५०० विशेष एसटी बसची घोषणा केली आहे. ४० किंवा अधिक भाविकांनी नोंदणी केल्यास गावातून थेट पंढरपूर बस सेवा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि महिलांना ५० टक्के सवलतीसह यंदा वारकऱ्यांसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jul 12, 2026 | 08:41 PM
आषाढीसाठी एसटीची मेगा तयारी, ५,५०० विशेष बस धावणार; ४० भाविक जमवा, गावातून थेट पंढरपूर गाठा; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

आषाढीसाठी एसटीची मेगा तयारी, ५,५०० विशेष बस धावणार; ४० भाविक जमवा, गावातून थेट पंढरपूर गाठा; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Follow Us
Follow Us:

पंढरपूर | शिवाजी हळणवर : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा ५ हजार ५०० विशेष एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित नोंदणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.

आषाढी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी चंद्रभागा बसस्थानक येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सरनाईक यांनी यात्राकाळात सर्व बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवा असे फलक लावणे, चालक-वाहकांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था तसेच परतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र मार्गनिहाय रांगा करून गर्दीचे शिस्तबद्ध नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Yavatmal News: रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला

यंदाच्या विशेष बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. विशेष बससाठी भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगारात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील वर्षी आषाढी यात्रेत एसटीने ५,१४५ विशेष बस चालवत २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्यापेक्षा अधिक व्यापक नियोजन करण्यात आले असून, एकादशीनंतरच्या परतीच्या गर्दीसाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहेत.

भाविकांच्या सुविधेसाठी चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) येथे चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, सीसीटीव्ही आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.यात्रेदरम्यान रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने करण्याची घोषणा केली.

भेसळीचे ३७ हजार लिटर दूध नष्ट, १५ लाखांचा दूधसाठा जप्त; जवळ्यातील अजिंक्यराणा अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

भीमा बसस्थानकाची पाहणी

आषाढी यात्रेच्या तयारीचा भाग म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बसस्थानकाची पाहणी केली. वारकरी भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

Web Title: Ashadhi wari 2026 st special bus pandharpur pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • Pratap Sarnaiik
  • st bus news

संबंधित बातम्या

प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा
1

प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा

साक्षात सूर्यनारायणाला ‘प्रभामंडळा’चा रिंगण; Dive घाटात विठ्ठलाच्या मूर्तीवर ‘प्रभामंडळ’, पहा अद्भुत क्षण
2

साक्षात सूर्यनारायणाला ‘प्रभामंडळा’चा रिंगण; Dive घाटात विठ्ठलाच्या मूर्तीवर ‘प्रभामंडळ’, पहा अद्भुत क्षण

Ashadhi Wari 2026: लाखो वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम
3

Ashadhi Wari 2026: लाखो वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’
4

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.