Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा

वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात.घरच्यांना केवळ एक फोन करून ‘मी सुखरूप आहे’ एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 12, 2026 | 02:35 AM
प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा
Follow Us
Follow Us:
  • मोबाईल चार्जिगच्या ५ व्हॅन वारकऱ्यांच्या सेवेत दाखल
  • एका वेळी १०० माबाईल चार्ज होण्याची क्षमता
  • परिवहन मंत्री यांच्या स्वखर्चातून उपक्रम सुरू
पुणे: आषाढी वारी ही केवळ पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची यात्रा नसून,ती लाखो भाविकांच्या श्रद्धा, आणि भावविश्वाला जोडणारी अखंड जीवनयात्रा आहे.या यात्रेत अनेक वारकरी दिवसन्-दिवस पायी चालत असतात.अशा वेळी त्यांच्या हातातील मोबाईल बंद पडला,तर केवळ एक उपकरण बंद होत नाही,तर त्यांच्या घरच्यांशी असलेला संवादही तुटतो.या भावनेतून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५ अत्याधुनिक मोबाईल चार्जिंग व्हॅन तयार करून त्या वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित केल्या आहेत.

या मोबाईल चार्जिंग व्हॅन युवा शिवसैनिकांच्या माध्यमातून वारीसोबत सातत्याने प्रवास करत आहेत.गरजेनुसार प्रत्येक वारकऱ्याला पूर्णपणे मोफत आणि अल्पावधीत मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.एका वेळी १०० मोबाईल चार्ज करण्याची क्षमता असलेल्या या व्हॅनमुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात.घरच्यांना केवळ एक फोन करून ‘मी सुखरूप आहे’ एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते. मोबाईल चार्ज असल्यामुळे वारकरी आपल्या कुटुंबीयांशी २४ तास संपर्कात राहू शकतात,त्यांच्या मनातील काळजी दूर होते आणि वारीचा आनंद अधिक अनुभवता येतो.

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग परंपरांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

वारी ही सेवाभावाची परंपरा आहे.वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा.त्यांच्या हातातील मोबाईल चालू राहिला,तर त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य कायम राहील.ही सुविधा केवळ मोबाईल चार्ज करण्याची नाही,तर आपुलकी आणि विश्वास जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

प्रताप सरनाईक,
परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान; जाणून घ्या रिंगण सोहळ्याचे महत्त्व

रिंगण म्हणजे संतांच्या पवित्र उपस्थितीचा अनुभव

वारीतील सर्वात भावस्पर्शी आणि महत्त्वाचा सोहळा म्हणजे रिंगण. परंपरेनुसार पालखीतील संतांच्या पादुकांच्या सान्निध्यातील अश्वाला विशिष्ट मैदानात गोलाकार धाववले जाते. वारकऱ्यांचा विश्वास आहे की या अश्वात संतांची अदृश्य कृपा आणि चैतन्य असते. अश्व धावत असताना लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकोबा”चा गजर करतात. अश्वाच्या टापांखालची माती पवित्र मानून अनेक वारकरी ती मस्तकाला लावतात. ही माती संतांच्या चरणस्पर्शाने पावन झाल्याची भावना असते. रिंगणाचा संदेश असा आहे की संतांचे विचार आणि कृपा कोणत्याही एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून सर्व समाजासाठी समान आहेत. गोलाकार रिंगण समतेचे, अखंड भक्तीचे आणि जीवनचक्राचे प्रतीक मानले जाते.

Web Title: Pratap sarnaik registered for mobile charging at his own expense by serving 5 van varkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • pratap sarnaik
  • pune news

संबंधित बातम्या

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
1

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात
2

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
3

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
4

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.