Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Macron Syria Visit : दमास्कस हादरलं! मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यात भीषण स्फोट; हॉटेलबाहेरील हल्ल्यामुळे खळबळ

Macron Syria Visit Update : मॅक्रॉन यांच्या सीरियात दौऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. दमास्कस येथे एका हॉटेलबाहेर दोन मोठे स्फोट झाले असून यामध्ये १८ जण गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्याचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 03:01 PM
Macron Syria Visit blast

Macron Syria Visit blast

Follow Us
Follow Us:
  • मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्याला गालबोट
  • दमास्कमधील भीषण स्फोटाने खळबळ
  • स्फोटात १८ जण गंभीर जखमी
Macron Syria Visit News in Marathi : दमास्कस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या सीरियाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राजधानी दमास्कसमध्ये झालेल्या भीषण स्फोटांमुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन वास्तव करत असलेल्या हॉटेलबाहेर  दोन जोरदार स्फोट घडल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात १८ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सीरियाच्या अंतरिम सरकारचे राष्ट्राध्यक्ष अल-शरा यांच्या भेटीला गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रपती भवनात महत्त्वपूर्ण चर्चा सुरु होती. याचवेळी शहराच्या मध्यवर्ती भागातील फोर सीझन्स हॉटेलच्या परिसरात दोन मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. सरकारी माध्यमांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये मॅक्रॉन थांबले होते. सुदैवाने स्फोटावेळी ते राष्ट्रपती भवनात असल्याचे कोणतीही दुर्घटना झाली नाही.

१८ जण गंभीर जखमी

परंतु या स्फोटात हॉटेलच्या परिसरातील १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट एवढा भषण होता की हवेत धुराचे लोट पसरले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये जळालेली कार, रस्त्यावर रक्ताचे डाग आणि घटनास्थळी सुरु असलेली लोकांची धावपळ पाहायला मिळत आहे.

Multiple explosive devices just detonated near the Damascus hotel where French President Emmanuel Macron is staying for his historic visit to Syria pic.twitter.com/9f79VdEecu — Emily Schrader – אמילי שריידר امیلی شریدر (@emilykschrader) July 7, 2026

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

सध्या या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटना किंवा इतर कोणत्या गटाने स्वीकारलेली नाही. यामुळे हल्ल्याचा उद्देश अद्याप अस्पष्ट आहे. सध्या याचा तपास सुरु करण्यात आला आहे.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. काही जणांची प्रकृती अंत्यत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर

या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दुसरीकडे दमास्कचे गव्हर्नर माहेर इद्लिबी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगितले. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले.

या घटनेनंतर फ्रान्सच्या शिष्टमंडळाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आगे. मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्याच्या पुढील कार्यक्रमांवर हल्ल्याचा परिणाम होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WATCH: Damascus, near Macron’s hotel: One of the explosions appears to have been a car explosion. pic.twitter.com/OjfL3Hh9BI — Open Source Intel (@Osint613) July 7, 2026

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृत्यूचे तांडव! भूंकपामुळे 3,500 हून अधिक मृत्यूमुखी; हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली

Web Title: Macron syria visit damascus hotel blast explosion news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Emanuel Macron
  • France
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.