Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खरातने तोंड उघडल्यास अर्धे मंत्रिमंडळ उघडं पडेल’; ठाकरे गटाच्या माजी खासदाराचं मोठं विधान

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावर नाशिकच्या गौलाणे येथील शेतकरी विलास जाधव यांनी जमीन बळकावणे व भावाची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 11:43 AM
'खरातने तोंड उघडल्यास अर्धे मंत्रिमंडळ उघडं पडेल'; ठाकरे गटाच्या माजी खासदाराचं मोठं विधान

'खरातने तोंड उघडल्यास अर्धे मंत्रिमंडळ उघडं पडेल'; ठाकरे गटाच्या माजी खासदाराचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

चिपळूण : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिस तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे अनेक शक्यता असल्याचा सनसनाटी दावा शिवसेना (उद्धव गट) चे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. चिपळूण दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी खरात याच्या जीवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेची मागणी केली.

विनायक राऊत म्हणाले की, तपासात जसे-जसे नेत्यांची नावे पुढे येतील, तसे खरात याला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो. खरात याने तोंड उघडल्यास राज्यातील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांचे खरे चेहरे समोर येतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणाला त्यांनी महाराष्ट्राचे एपस्टिन प्रकरण असे संबोधत सखोल चौकशीची गरज व्यक्त राजकीय नेत्यांची नावे समोर येण्याची केली.

दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्याकडून राजीनामा घेऊन प्रकरण भरकटवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. तसेच सर्व संबंधित व्हिडिओ सार्वजनिक करावेत आणि दोषींना पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, दीपक केसरकर यांच्या एसआयटी चौकशीची मागणी करत, या प्रकरणात मोठ्या राजकीय षड्यंत्राची शक्यता असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

खरात, चाकणकरांवर मकोका लावा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) चे प्रवक्ते सुनील माने यांनी अशोक खरात व सहकाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत त्यांनी आरोप केला की, प्रभावशाली लोकांच्या संरक्षणाखाली अनैतिक कृत्ये सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

जमीन बळकावण्यासाठी सुपारी देऊन हत्या

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावर नाशिकच्या गौलाणे येथील शेतकरी विलास जाधव यांनी जमीन बळकावणे व भावाची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप केला. २०२२ मधील तक्रारीनंतर न्यायालयीन निकालाआधीच भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला.

प्रकरणाचा तपास 5-6 महिन्यांपूर्वीच झाला

भोंदू अशोक खरात याच्याबाबत पीडित महिलेने वर्षभरापूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्याचा तपास पाच-सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. परंतु या सरकारमध्ये जे काही दोन तीन पक्ष सहभागी आहेत, त्या पक्षातील अनेक लोक या भोंदू बाबामुळे अडचणीत येणार होते. म्हणून गृह विभागाने नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास लोकांपुढे आणण्याचे काम केले आहे, असा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

हेदेखील वाचा : Ahilyanagar News : खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत

Web Title: Ashok kharat life is in danger situation says ex mp vinayak raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Maharashtra Politics
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले
1

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ
2

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?
3

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा
4

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.