Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप

भर पावसात कोठींबे जामरुंग रस्त्यावर करण्यात आलेले डांबरीकरण हे दोन दिवसांनी धुवून निघाले असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. या डांबरीकरणाचे काम अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2025 | 06:32 PM
भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप

भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : कर्जत तालुक्यातील कोठींबे जामरुंग रस्त्यावर एक किलोमिटर लांबीचा रस्ता भर पावसात डांबरीकारण करण्यात येत होता.अवकाळी पाऊस आणि सुरू असलेले डांबरीकरण याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित रस्त्यावरील डांबरीकरण पावसाचा जोर कमी झाल्यावर नव्याने करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. दरम्यान,भर पावसात करण्यात आलेले डांबरीकरण हे दोन दिवसांनी धुवून निघाले असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.

शिवाईनगर भागातील रहिवाशांना दिलासा, वाढीव पाणी बिलास मिळाली स्थगिती

तालुक्यातील कशेले भागातील कोठिंबे पासून पुढे जामरुंग आंबिवली रस्त्याचे कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम अर्थ संकल्पात मंजूर झाले आहे.या रस्त्यातील गावे असलेल्या ठिकाणी काँक्रीटीकरण आणि अन्य रस्त्यावर कार्पेट डांबरीकरण केले जाणार आहे.उन्हाचा प्रभाव हा मे महिन्यात जास्त असतो,पण मे महिन्यात कधीही अवकाळी पाऊस होऊ शकतो.त्यामुळे राज्यात कुठेही १५ मे नंतर डांबरीकरण करण्यावर निर्बंध आहेत.मात्र कर्जत तालुक्यातील कोठिंबे आंबिवली जामरुंग रस्त्यावर मंजूर असलेले डांबरीकरण ठेका मिळविणाऱ्या ठेकेदाराने १८ मे रोजी करण्याचा प्रयत्न केला.परंतु त्या दिवशी या भागात प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू होता. परंतु निधी लाटण्यासाठी ठेकेदाराने सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा विचार न करता डांबरीकरण काम सुरू केले आणि तब्बल एक किलोमिटर पेक्षा अधिक लांबीचा रस्ता डांबरीकरण केला.

भर पावसात केलेले डांबरीकरण टिकाव धरणार का? हा मोठा प्रश्न असून ठेकेदाराने आणि त्या कामावर नियंत्रण असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कशेले खांडस, आंबिवली भागात आठ दिवस सतत सुरू असलेला अवकाळी पाऊस लक्षात घेवून डांबरीकरण करण्याचा घाट घालण्याची अजिबात आवश्यकता नव्हती.मात्र तरी देखील कार्पेट डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि डांबरीकरण केले जात असताना सुरू असलेला अवकाळी पाऊस यांचे व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाले आणि ठेकेदाराची चलाखी जनतेसमोर आली.

या रस्त्याची दोन दिवसांनी पाहणी केली असताना कोठिंबे आंबिवली भागातील आनंदवाडी खानंद भागातील तयार झालेल्या एक किलोमिटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामाची अवस्था दयनीय आहे.आनंद वाडी फाटा भागातून कशेले कडे येणाऱ्या रस्त्यावरील डांबरी थर पावसाच्या पाण्यात निघून गेला आहे.या डांबरीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.त्यामुळे १५ मे नंतर डांबरीकरण करण्याची परवानगी देणाऱ्या बांधकाम खात्याला देखील जाब विचारण्याची गरज आहे.

संबंधित रस्त्याचे काम पावसाचा जोर कमी झाल्यावर पुन्हा डांबरीकरण करून घेतले जाणार आहे.मात्र रस्त्यावरील डांबरीकरण करण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी प्रतिक्रिया उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजीव वानखेडे यांनी दिली.

Mithi River Project Scam: मिठी नदी स्वच्छता प्रकल्प घोटाळ्यात ईडीची एंट्री; ६५ कोटींचा गैरव्यवहार उघड

Web Title: Asphalt paving of the road in heavy rain the prowess of the public works department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 06:32 PM

Topics:  

  • BMC
  • Karjat
  • Monsoon

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
1

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत
2

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना
3

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना

BMC Election: महापालिका निवडणुकीत VVPAT वापरला जाणार नाही, आयोगाने सांगितले कारण, विरोधक मात्र संतप्त
4

BMC Election: महापालिका निवडणुकीत VVPAT वापरला जाणार नाही, आयोगाने सांगितले कारण, विरोधक मात्र संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.