Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवसरीत विद्यार्थिनीच्या हातावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न; मुलींमध्ये भीतीचे वातावरण

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा हात धरून हातावर स्प्रे मारण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला. या घटनेमुळे पालक व विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 26, 2023 | 09:38 AM
अवसरीत विद्यार्थिनीच्या हातावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न; मुलींमध्ये भीतीचे वातावरण
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा हात धरून हातावर स्प्रे मारण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला. या घटनेमुळे पालक व विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे दोन घटना विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.

अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पाचवी व आठवीतील दोन सख्या बहिणी शुक्रवारी (दि २४) सकाळी साडेदहा वाजता विद्यालयात जात होत्या. जुन्या बँक बडोदा शाखेजवळ दोन मोटरसायकलवर आलेल्या चार व्यक्तींनी रस्त्यावर जात असलेल्या मुलींना थांबवत एका मुलाने इयत्ता पाचवीच्या मुलीचा हात हातात धरला. त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने खिशातून स्प्रे काढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान साधून तिच्या मोठ्या बहिणीने बॅगमधील भरलेली पाण्याची बॉटल हात धरलेल्या मुलाच्या हातावर जोरात मारत आरडाओरडा केला. त्यावेळी ते चौघेजण मोटार सायकलवर पळून गेले. त्यांच्याबरोबर एक चारचाकी वाहन व त्याच्यात सहा ते सात व्यक्ती असल्याचेही या मुलींनी सांगितले.

या दोघी बहिणी घाबरलेल्या अवस्थेत घरी गेल्या असता आई वडील कामानिमित्त बाहेर गेल्याने घराला कुलूप होते. संशयित व्यक्ती आपला पाठलाग करतील या भीतीने दोघी बहिणी घराशेजारील पूर्ण वाढ झालेल्या कडवळाच्या पिकात दोन तास लपून बसल्या. काही दिवसांपूर्वी भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा घटना घडल्याने विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकाचे मोबाईल नंबर घेऊन ठेवले आहेत. या दोन बहिणी शाळेत का आल्या नाहीत, याबाबत शिक्षकांनी पालकांना घरी फोन करून विचारले असता त्यांच्या घरच्यांनी मुली शाळेत गेल्या असल्याचे सांगितले. त्यावेळी कुटुंबियांनी मुलींचा शोध घेतला असता त्या शेतात मिळाल्या.

दोन महिन्यात तिसरी घटना

दोन महिन्यापूर्वी तांबडेमळा येथील मुली शिक्षण घेण्यासाठी गावात येत असताना दोन मुलींना अडवून तोंडावर स्प्रे मारणे, सायकल अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर ही तिसरी घटना घडल्याने मुलींसह, पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बीट अंमलदार गावात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप

अवसरी खुर्द गावात असे प्रकार वारंवार घडत असून अवसरी बीट अंमलदार मात्र गावात फिरताना दिसत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे ग्रामीण अधिक्षक यांनी मंचर पोलीस ठाण्याला योग्य त्या सूचना द्याव्यात. तसेच बीट अंमलदाराची बदली करुन अवसरी खुर्द येथील घटनेचा मंचर पोलिसांनी तत्काळ तपास करून योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

[blockquote content=”भैरवनाथ विद्यालयात सकाळी व सायंकाळी सिव्हील ड्रेसमध्ये पोलिस व्हॅन पाठवली जाईल. साध्या गणवेशातही महिला पोलीस फिरून गावात लक्ष ठेवणार असून, गाव व शाळा परिसरात संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.” pic=”” name=”- बलवंत मांडगे, पोलीस निरीक्षक, मंचर पोलीस ठाणे”]

Web Title: Attempt to spray a students hand a climate of fear among girls nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2023 | 09:38 AM

Topics:  

  • Ambegaon
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
3

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.