Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औसा-भादा-मुरूड रस्‍त्‍याचे काम लवकरच पुर्ण केले जाईल : आमदार रमेश कराड

भादा, शिवली मार्गे औसा ते मुरूड या रस्‍ता कामासाठी शासनाकडे आग्रही मागणी करून या कामासाठी निधी उपलब्‍ध करून घेतला जाईल व लवकरात लवकर या रस्‍त्‍याचे काम रुंदीकरणासह केले जाईल, असे भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रमेश कराड यांनी औसा तालुक्‍यातील मौजे भादा येथून या मागणीसाठी पायी आलेल्‍या पंचेवीसपेक्षा अधिक तरूणांना आश्‍वासन दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2022 | 07:33 PM
औसा-भादा-मुरूड रस्‍त्‍याचे काम लवकरच पुर्ण केले जाईल : आमदार रमेश कराड
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : भादा, शिवली मार्गे औसा ते मुरूड या रस्‍ता कामासाठी शासनाकडे आग्रही मागणी करून या कामासाठी निधी उपलब्‍ध करून घेतला जाईल व लवकरात लवकर या रस्‍त्‍याचे काम रुंदीकरणासह केले जाईल, असे भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रमेश कराड यांनी औसा तालुक्‍यातील मौजे भादा येथून या मागणीसाठी पायी आलेल्‍या पंचेवीसपेक्षा अधिक तरूणांना आश्‍वासन दिले.

औसा ते मुरूड भादा, वरवडा, शिवली, शिंदेवाडी मार्गे जाणारा रस्‍ता राज्‍यमार्ग मंजूर आहे. या संपूर्ण रस्‍त्‍याची दयनीय अवस्‍था झाली असून, रस्‍त्‍यात खड्डे की खड्यात रस्‍ते असा प्रश्‍न प्रत्‍येकानाच पडल्‍याशिवाय राहत नाही. सदर रस्‍त्‍यावरून दररोज तालुक्‍याच्‍या व जिल्‍हयाच्‍या ठिकाणी भाजीपाला, दुध, फुले घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याबरोबरच रोजी रोजगार व उद्योगधंद्यासाठी तरूणांना जावे लागते. शाळा कॉलेजसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्‍यांना व शासकीय कामासाठी सर्वसामान्‍य नागरीकांना सतत या रस्‍त्‍यावरून जावे लागते. प्रवास करणाऱ्या प्रत्‍येकाला आपला जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या रस्‍त्‍यावर काहींना आपला जिव गमवावा लागला आहे.

सदरील रस्‍त्‍याची दुरावस्‍था आणि सर्वसामान्‍य नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेवून, औसा तालुक्‍यातील मौजे भादा येथील पंचेवीसहून अधिक तरूणांनी अंबाजोगाई रोड वरील संवाद या संपर्क कार्यालयात भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेश कराड यांची भेट घेवून रस्‍त्‍याची दुरावस्‍था सांगून याबाबतचे सविस्‍तर निवेदन देवून हा प्रश्‍न प्राधान्‍याने सोडवावा, अशी आग्रहाची मागणी केली.

भादा येथील शिष्‍टमंडळाशी चर्चा करताना कराड यांनी भादा, शिवली मार्गे औसा ते मुरूड या रस्‍ता कामासाठी शासनाकडे आग्रह धरून या रस्‍त्‍याचे काम तात्‍काळ सुरू व्‍हावे यासाठी संबंधीताकडून निधी उपलब्‍ध करून घेतला जाईल व लवकरात लवकर या रस्‍त्‍याचे काम रुंदीकरणासह केले जाईल असे आश्‍वासन दिले.

[read_also content=”आरबीआयच्या नियमांचे पालन करून बारामती बँकेचा नावलौकिक वाढवू : अजित पवार https://www.navarashtra.com/maharashtra/we-will-enhance-the-reputation-of-baramati-bank-by-following-rbi-norms-ajit-pawar-nrdm-329696.html”]

भादा येथून पायी आलेल्‍या या शिष्‍टमंडळात अमोल पाटील, सुर्यकांत उबाळे, सचिन मुकडे, योगेश पाटील, जयप्रकाश हजारे, बबलू हजारे, शंभू पाटील, सुरेश शिंदे, फिरोज पठाण, प्रदिप उबाळे, संतोष कांबळे, शंकर मोहिते, कलिम शेख, शंकर गावळी, बालाजी चौधरी, मारूफ पठाण, राजाभाऊ गाडेकर, उजय उबाळे, सुरेश भोजने, परमेश्‍वर देवणे, भिमाशंकर पाटील, भाऊसाहेब कात्रे, श्रीमंत दरेकर, गणपती आगलावे, सदाशिव क्षीरसागर, विजय खंदारे, राज पठाण यांच्‍यासह अनेकांचा समावेश होता.

Web Title: Ausa bhada murod road will be completed soon mla ramesh karad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2022 | 07:33 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Murud

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप
1

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
2

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला
3

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश
4

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.