मुंबईः मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क या सोसायटीतील इमारतीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तसेच काही बायरबंब घटनास्थळी दाखल झालेत. दरम्यान, या इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आग लागल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. पंरतू आग अजुनही सुरु आहे, शंभर टक्क आग विझली नाही.
[read_also content=”सोमय्या पिता-पुत्राला दिलासा, किरीट सोमय्या व नील सोमय्यांना आयएनएस विक्रांत बचाव घोटाळ्यातून क्लीन चीट, सोमय्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया… https://www.navarashtra.com/maharashtra/relief-to-somaiya-father-son-kirit-somaiya-and-neil-somaiya-clean-cheat-from-ins-vikrant-rescue-scam-somaiya-reacts-353628.html”]
या इमारतीमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. या सर्वांना सुखरुप बाहर काढले आहे. या आगीच कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज सकाळी 10.45 वाजत ही आग लागली अशी माहिती अग्निशमन दलाने दिली होती. लेव्हल 1 ची ही आग असल्याचे सांगितले आहे. सलग दुसऱ्यांदा या इमारतीमध्ये आगीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले
22 ऑक्टो 2021 रोजी याच बिल्डिंगला लागली होती आग
मागील वर्षी 22 ऑक्टोबर रोजी याच 60 मजली इमारतीला 19 व्या मजल्यावर भीषण आगीची घटना घडली होती. त्यावेळी आग 25 व्या मजल्यापर्यंत आगीचे लोट पोहोचले होते. दरम्यान, या आगीच्या वेळी आपला जीव वाचविण्यासाठी अरुण तिवारी (30) सुरक्षा रक्षकाने 19 व्या मजल्यावरुन उडी मारली होती. यात या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. पुन्हा एकदा या इमारतीला आग लागल्यामुळं फायर ऑडिचा तसेच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यानंतर वर्षभरानं पुन्हा आगीची घटना घडल्याने आता आगीचे कारण काय? आणि सतत अशा घटना का घडत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.