Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: महिला शक्तीचा जागर! महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य साताऱ्यात बाईक रॅली

"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या शिक्षणाच्या पायामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रांत नेतृत्वाची शिखरे सर करत आहेत, अशा शब्दांत संतोष पाटील यांनी या रॅलीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 13, 2026 | 07:12 PM
महिला शक्तीचा जागर! महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य साताऱ्यात बाईक रॅली

महिला शक्तीचा जागर! महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य साताऱ्यात बाईक रॅली

Follow Us
Follow Us:
  • महिला शक्तीचा जागर!
  • महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य साताऱ्यात बाईक रॅली
  • हातात सामाजिक संदेशांचे फलक
सातारा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा शहरात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य ‘बाईक रॅली’ काढण्यात आली. “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या शिक्षणाच्या पायामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रांत नेतृत्वाची शिखरे सर करत आहेत, अशा शब्दांत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या रॅलीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा माहती अधिकारी वर्षा पाटोळे, गणेश देशमुख, नेताजी बिसले, प्रकाश जाधव, उद्धव इंगवले यांच्यासह विविध विभागांच्या महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळी गांधी मैदान येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. डोक्यावर फेटा, हातात सामाजिक संदेशांचे फलक आणि ‘जय जिजाऊ, जय सावित्री’च्या जयघोषाने सातारा शहर दुमदुमून गेले होते. शेकडो महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या दुचाकींसह या रॅलीत सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.

Aditi Tatkare : बालकांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी ‘डिजिटल कवच’ आवश्यक, आदिती तटकरे यांचं वक्तव्य

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, आज आपल्या महिला अधिकारी पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस कामगिरी करत आहेत. सावित्रीबाईंच्या विचारांमुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. नोकरीमध्ये स्थिरावल्यानंतर आता समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. ज्या उत्साहात आज ही बाईक रॅली काढण्यात आली, तसाच उत्साह आणि कर्तव्यदक्षता वर्षभर आपल्या शासकीय कामकाजातही दिसून येवो, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली म्हणाल्या, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी महिला काढण्यात आली आहे. आम्ही सगळे अगदी सक्षमपणे प्रशासनात काम करीत आहोत. समाजातील प्रत्येक मुलीने संकटांना तोंड देण्यासाठी अजिबात घाबरू नका आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करा हीच खरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडे करुन दिले त्याला न्याय दिल्यासारखे होईल.

Education Ministry: मराठी न शिकवल्यास थेट मान्यता रद्द होणार; शाळांच्या मनमानी कारभारावर शिक्षण मंत्र्यांचा ‘हंटर

Web Title: Awakening of women power grand bike rally of women officers and employees in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • womens day

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
2

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
3

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.