फोटो सौजन्य: Gemini
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये उपनगराध्यक्षा शालिनी संजय सुखधान, त्यांचे पती संजय लक्ष्मण सुखधान, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र कारभारी काळे, दिनेश व्यवहारे, नगरसेविका सोनल राहुल चव्हाण, आसिफ पठाण, नगरसेविका जयश्री चंद्रकांत शिंदे, नगरसेवक जितेंद्र भाऊसाहेब कुन्हे, नगरसेवक स्वप्नील उर्फ सागर राजेंद्र मापारी आणि नगरसेवक संभाजी शिवाजी धोत्रे यांचा समावेश आहे.
Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड
तक्रारीनुसार, २७ जानेवारी रोजी शासकीय कामकाज सुरू असताना उपनगराध्यक्षांचे दालन अस्वच्छ असल्याच्या कारणावरून तसेच बैठकीस आमंत्रित अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्याच्या कारणावरून उपस्थित कर्मचाऱ्यांना धाकदपटशा व दमदाटी करून कार्यालयाबाहेर काढण्यात आले. तसेच २९ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे कार्यालयात काम करत असताना उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान व नगरसेवक जितेंद्र कुन्हे तेथे आले होते. यावेळी संजय सुखधान यांनी पत्नीला शिवी दिल्याचा बनाव करून अंगावर धावून आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांनी या प्रकरणाला राजकीय किनार असल्याचा आरोप केला आहे. नेवासेकरांनी दिलेल्या विकासाच्या जबाबदारीपासून नगराध्यक्ष पळ काढत असून, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांना विश्वासात न घेता प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून आमच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही या सर्व बाबींना संविधानिक पद्धतीने उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, स्वच्छतेबाबत बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांनी २७ जानेवारी रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतरच आठवडाभराने फिर्याद दाखल झाल्याने या तक्रारीमागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.






