Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले

अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. भीमा नदीच्या पुरामुळे श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला असून, दुसरीकडे पारनेर तालुक्यातील सुपा बसस्थानक परिसरही पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 09:22 AM
Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले

Follow Us
Follow Us:
  • भीमा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटाचा मुख्य भूमीशी संपर्क तुटून सुमारे 200 ग्रामस्थ अडकले आहेत.
  • अडकलेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने बोटींद्वारे बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे.
  • संततधार पावसामुळे सुपा बसस्थानक आणि मुख्य चौक जलमय झाला असून कायमस्वरूपी निचरा व्यवस्थेची मागणी जोर धरत आहे.
पोपट पिटेकर

श्रीगोंदा,अहिल्यानगर: पुणे जिल्ह्यात आणि भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने श्रीगोंदा तालुक्यातील ‘आर्वी बेट’ या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. यामुळे या बेटाचा मुख्य भूमीशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील सुमारे २०० लोकांची वस्ती पुराच्या पाण्यात अडकली आहे.

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

प्रशासनाकडून बोटींद्वारे मदतकार्य सुरू

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. अडकलेल्या ग्रामस्थांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी प्रशासनाकडून बोटींचा वापर केला जात आहे. बोटींच्या माध्यमातून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे व त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पूरपरिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्थानिक महसूल विभाग परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून नदीकाठच्या आणि बेटावरील सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा आणि काळजी घेण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. तसेच, कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुपा बसस्थानक परिसर झाला जलमय

पारनेर तालुक्यातील नगर पुणे महामार्गावरील सुपा परिसरात झालेल्या पावसाने शेतकरी, कंपनी कामगार, शालेय विद्यार्थी यांची तारांबळ उडाली. शहराला पहाटे पासूनच पावसाने झोडपून काढले. यात दुध व्यवसायिक शेतकरी, कंपनीत ये-जा करणारे कामगार तसेच जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालये व उच्च्च माध्यमिक विद्यालयात जाणारे विद्यार्थी यांची एकच तारांबळ उडाली. अशीच तारांबळ प्रत्येक वर्षी पावसाळ्यात घडत असते. यावर ठोस पर्याय अद्यापही होऊ शकला नाही. याबाबत नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.

तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे येथील तालुका दूध संघापासून बाजार तळाचे सर्व पाणी मेन चौकात येते. हे पाईपच चोकप झाल्यामुळे हे पाणी थेट नगर – पुणे महामार्गावर आले. सुपा मेन चौक व बस स्थानक परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एसटी प्रवाशांना पावसाळ्यात सुपा मेन चौकात जाणे येणे कठीण झाले आहे. प्रवासी, कामगार, विद्यार्थी, वयोवृद्ध, महिला यांची आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने दखल घेतली नाही.

Mira Bhayandar News: मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती; पर्यटनस्थळे बंद, आदेश मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई

चौकाला कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज

सुमारे वीस ते बावीस गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहराला नेहमी वर्दळ असते, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, कंपनी कामगार, शेतकरी, विक्रेते यांना याच चौकातून सुपा शहरात प्रवेश करावा लागतो, याठिकाणी सर्कल तयार करून, रस्ता रूंदीकरणासह अंतर्गत ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून पाणी बाहेर काढून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे.

Web Title: Heavy rains trigger flood crisis in shrigonda arvi beta village contact has been completely cut off from the mainland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज
1

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार!  DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची  सूट
2

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
3

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
4

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.