Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा (फोटो-सोशल मीडिया)
Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्ने यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. अमोल गर्जे यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, सरावली ग्रामपंचायतीत रस्ते कामांमध्ये प्रशासकीय मंजुरी नसताना कामे करणे, सार्वजनिक निधीचा अपहार आणि निवृत्त ग्रामसेवकांच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा
२ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात तक्रार दाखल करूनही, गट विकास अधिकारी स्तरावर केवळ औपचारिक पत्रव्यवहार करून वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप गर्जे ह्यांनी केला आहे. ग्रामसभेत ठराव होऊन आणि निधी उपलब्ध असूनही ‘आनंदी नगर रस्ता’, रेशन दुकान चाळ रस्ता’ आणि सौर दिवे बसवण्यासारखी महत्त्वाची विकासकामे रखडलेली आहेत. दुसरीकडे, कोणत्याही शासकीय मंजुरीशिवाय काही विशिष्ट भागात डांबरीकरणाची कामे सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेचा अपमान असून यात मोठे आर्थिक संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अराजकता; रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला
प्रशासनाने ६ दिवसांत लेखी उत्तर न दिल्यास आणि १८ फेब्रुवारीपर्यंत दोषींवर शिस्तभंग किंवा कायदेशीर कारवाई न केल्यास, गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर संबंधित कागदपत्रे फाडून ‘कागद फाडो’ निषेध आंदोलन करण्यात येईल, असा अंतिम इशारा गर्जे यांनी दिला आहे. अमोल गर्जे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणातील ‘जाणीवपूर्वक झालेला विलंब’ आणि ‘अपूर्ण चौकशी’ यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांचे लक्ष वेधले. रानडे यांनी या प्रकरणाची दखल घेत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






