Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Plane Crash Breaking: बारामतीत पुन्हा विमान अपघात;सुदैवाने वैमानिक सुरक्षित

Baramati Plane Crash Breaking रेड बर्ड कंपनीचे हे दोन आसनी प्रशिक्षण विमान तांत्रिक बिघाडामुळे गोजुबाबी गावाजवळ कोसळले.उड्डाणादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता.

  • By anuradha sagar
Updated On: May 13, 2026 | 11:22 AM
Baramati Plane Crash News,

Baramati Plane Crash News,

Follow Us
Follow Us:

Baramati Plane Crash : बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात झाल्याची बातमी समोल आली आहे. गोजुबावी गावच्या जवळ रेडबर्ड फ्लाईट अॅकॅडमीचे एक शिकाऊ विमान कोसळले.  अर्धा तासापूर्वी झालेल्या या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले  असले तरी विमानातील शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. बारामतीत सातत्याने होणाऱ्या या विमान अपघातांच्या मालिकांमुळे  प्रशिक्षणादरम्यानच्या तांत्रिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि मदतकार्य पोहोचले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रेड बर्ड कंपनीचे हे दोन आसनी प्रशिक्षण विमान तांत्रिक बिघाडामुळे गोजुबाबी गावाजवळ कोसळले.  उड्डाणादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र बारामतीच्या गोजुबाबी परिसरात विमानाचे जोरदार लँडिंग झाले.  या अपघातात कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही.   स्थानिक रहिवाशांनी विमान वेगाने खाली येताना पाहिले, तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथकेही घटनास्थळी दाखल झाली. एक तांत्रिक पथक सध्या विमानाची तपासणी करत आहे.

Water Shortage in Pune: पुणे जिल्ह्याच्या पाणी टंचाईवर प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’; ३५ कोटी ७४ लाखांचा आराखड्याला मंजूरी

 

 

मिळालेल्या माहितीनुसार,  जानेवारी महिन्यात ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले होते. ज्या  अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा विमान कोसळल्याने संपूर्ण बारामतीत पुन्हा एकदा चिंतेचे सूर उमटू लागले आहेत.  प्रशिक्षण कर्तव्यावर असलेल्या वैमानिकाच्या लक्षात सकाळी ८:४० च्या सुमारास गोजुबावी गावाजवळ विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातचहा अपघात झाला.

महत्त्वाची बाब म्हणजे   वैमानिकाने प्रसंगावधान राखत  विमान निवासी भागापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. पण  विमानाचे इंजिन बंद पडले. पण विमान कोसळण्यापूर्वीच तो विमानातून बाहेर पडला.  यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. स्थानिक आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

Pune Ring Road Project: १४,२०० कोटींचा मेगा प्रोजेक्ट; पुणे रिंग रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा

यापूर्वी याच गावात झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. २८ जानेवारी रोजी, व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले होते. विमान मुंबईहून बारामतीला जात होते आणि त्यात अजित पवार व इतर चार जण होते, ज्यांचा अपघातात मृत्यू झाला.

तपासाची प्रगती कितपत झाली आहे?

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जवळपास चार महिन्यांनी, बंगळूर पोलिसांनी त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ‘झिरो एफआयआर’ नोंदवला आहे. रोहित पवार यांनी राज्य सरकार गंभीर आरोप केले आहेत. काका अजित पवार यांना संपवण्यासाठीच हा अपघाताचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या अपघाताची २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.  पण पोलिसांनी FIR  नोंदवून घेतला नाही. सुरक्षा नियमांचे पद्धतशीर उल्लंघन आणि कामकाजातील घोर निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आला आहे.

Web Title: Baramati plane crash breaking redbird flight academy accident aircraft crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • baramati news
  • Plane Crash

संबंधित बातम्या

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
1

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा
2

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा

बारामतीच्या मातीतला शब्दांचा ‘देवकाते’ वारसा नव्या पिढीसमोर आणण्याची गरज
3

बारामतीच्या मातीतला शब्दांचा ‘देवकाते’ वारसा नव्या पिढीसमोर आणण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.