Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: लोकसभेला बारामतीकरांनी माझा…; विधानसभेलाही अजित पवारांना तीच भीती

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल मनात ठेवून अजित पवार यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 11, 2024 | 01:36 PM
'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती

'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती

Follow Us
Follow Us:

बारामती :  लोकसभा निवडणुकीत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. बारातमतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली आणि सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला. त्यांच्या या पराभवाची सल आजही अजित पवार यांच्या मनात असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी आज पुन्हा  आपल्या मनातील ही सल बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार यांनी आज बोलून दाखवली. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते सोमेश्वरनगर येथे बोलत होते.

लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, या पॅटर्नची आठवण करून देत अजित पवार म्हणाले, लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला आणि मी तो स्वीकारला. पण मनातील खदखद व्यक्त करतानाच त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत मतदान कऱण्याचे आवाहन केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी हक्काने तुमच्याकडे मते मागण्यासाठी आलो आहे. यावेली मला खूश करण्यासाठी विधानसभेला मला मतदान करा, असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं.

हेही वाचा: ‘महायुती सरकार लाडकं नव्हे तर लबाड…’, विलासराव देशमुखांच्या लेकाने लातूरमध्ये गाजवली सभा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल मनात ठेवून अजित पवार यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच काका विरूद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. त्यामुळे बारामतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपापली ताकद पणाला लावली आहे.त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार म्हणाले, सध्या बारामतीकर द्विधा मनस्थितीत आहेत. पण त्यांना माझी विनंती आहे. त्यांनी लोकसभेला सुप्रियाताईंना  मतदान केले आता विधानसभेला मला मतदान करतील. बारामतीत सगळ्यात जास्त कामेही ही माझ्या कारकिर्दीत झाली आहेत. अनेकांनी माझ्या बरोबरच कामाला सुरुवात केली होती. पण गावातील राजकारणातही वाद आहेत. तेही मला चांगलेच माहिती आहेत. पण आता या वादाचा फटका मला बसू देऊ नकात.

हेही वाचा: माढा विधानसभेत येणार रंगत; संजय कोकाटेंसह भारत शिंदेंचा अभिजीत पाटलांना पाठिंबा

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. महायुतीचे आम्ही सर्व नेते जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहोत. महायुताली 175 पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. आमचे नियोजन आणि चर्चा झाल्या आहेत. कोणाचा सभा घ्यायच्या याबाबतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा झाली आहे.

Web Title: Baramati politics ajit pawar loksabha election maharashtra assembly election sharad pawar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 01:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • LOKSABHA ELECTION
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
1

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
2

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
3

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.