Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित

बारामती तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील एकूण २३ योजनांपैकी प्रशासकीय मान्यता प्राप्त योजनांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना शाश्वत, दर्जेदार आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 24, 2026 | 08:05 PM
Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी  सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना  पालिकेकडे हस्तांतरित
Follow Us
Follow Us:

Baramati Water Supply:   बारामती शहर व परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, परिणामकारक आणि दीर्घकालीन स्वरूपाची करण्याच्या दृष्टीने जळोची व तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

बारामती शहर पाणीपुरवठा योजनेसह तालुक्यातील २३ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी विधान भवन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे यांच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, बारामती नगरपालिकेचे गटनेते संजय संघवी तसेच नगरसेवक अल्ताफ सय्यद उपस्थित होते.

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत

बैठकीदरम्यान बारामती शहरातील जळोची-तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना आणि शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-१ अंतर्गत पूर्ण झालेली कामे तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. तसेच शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-२ मधील प्रलंबित कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही वेगाने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

बारामती शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या साठवण तलावामध्ये आढळून आलेली गळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक तांत्रिक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत

यावेळी बारामती तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील एकूण २३ योजनांपैकी प्रशासकीय मान्यता प्राप्त योजनांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना शाश्वत, दर्जेदार आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

बारामती शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांना गती देणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधत वेळबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

 

Web Title: Baramati water supply scheme sunetra pawar orders mjp to transfer jalochi tandulwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • baramati news
  • Pune water supply
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा
1

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा

बारामतीच्या मातीतला शब्दांचा ‘देवकाते’ वारसा नव्या पिढीसमोर आणण्याची गरज
2

बारामतीच्या मातीतला शब्दांचा ‘देवकाते’ वारसा नव्या पिढीसमोर आणण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.